सण-उत्सव
वाकडीत सावता महाराज पुण्यतिथी साध्या पद्धतीने साजरी
राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरात संत सावता महाराज यांची ७२६ वी पुण्यतिथी यावर्षी देखील कोरोना महामारीमुळे साध्या पद्धतीने पण मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते,हा अधिकार सर्वांना आहे.‘न लगे सायास, न पडे संकट,नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले.धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले होते.त्यांना पुण्यतिथी निमित्त वाकडीत विनम्र अभिवादन करण्यात आले आहे.
ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे.‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले.धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले.समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत.त्यांची पुण्यतिथी सर्वत्र उत्साहात संपन्न होते.ती तशी वाकडीतही संपन्न झाली आहे.