शैक्षणिक
विद्यार्थ्यांना गुणवत्तेबरोबरच स्वतःची आंतरिक प्रेरणा अधिक महत्त्वाची-मार्गदर्शन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
यू.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षेसाठी पदवी स्तरावरील गुणवत्तेबरोबरच स्वतःची आंतरिक प्रेरणा अधिक महत्त्वाची असते केवळ कुणीतरी सांगितलं म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करू नये असे आवाहन करून कला व वाणिज्य विज्ञान या शाखेतील विद्यार्थ्यांनी अगदी बारावी पासून यूपीएससीची तयारी करु शकत असल्याचे प्रतिपादन अहमदनगरचे उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी नुकतेच केले आहे.
“विद्यार्थ्यांनी स्वतःच्या चुका सुधारून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व स्वतःचा उत्तम असा बी प्लॅन सुद्धा तयार ठेवावा यूपीएससी चा अभ्यास करु इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी शक्यतो आत्मविश्वास वाढवणार्या शाखेतूनच पदवीचे शिक्षण घ्यावे.त्याचबरोबर इंग्रजी भाषेचा अधिक बाऊ न करता कामापुरती इंग्रजी शिकुन देखिल यशस्वी होता येते“-विशाल नरवाडे,जिल्हाधिकारी,सांगली जिल्हा.
कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमय्या महाविद्यालयात यूपीएससीचा अभ्यास करणार्या उमेदवारांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन आयोजित केले होते.त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकचे संचालक डॉ.मालोजीराव भोसले,कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव अॅड.संजीव कुलकर्णी,संदीप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव आदी मान्यवरांसह सव्वा तीनशेहून अधिक मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये स्मार्टफोन हा अत्यंत वेगाने मागे खेचणारा मोठा सायलेंट किलर आहे.त्याचबरोबर मित्रपरिवार कुटुंब व आई-वडील यांची सकारात्मक भूमिका विद्यार्थ्यांना लवकर यशोशिखरावर नेते.
या कार्यक्रमास कोपरगाव व राहाता तालुक्यातील एकूण अकरा महाविद्यालये या कार्यक्रमात सहभागी झाली होती.संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय,कोपरगाव,एस.एस.जी.एम.महाविद्यालय कोपरगाव,सुशिलामाई काळे महाविद्यालय,कोळपेवाडी,संजीवनी फार्मसी महाविद्यालय,कोपरगाव,श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी,साई निर्माण महाविद्यालय शिर्डी,महिला महाविद्यालय कोपरगाव,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राहाता या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा प्राधान्याने सहभाग होता.या सर्व महाविद्यालयांचे समन्वयक महाविद्यालय म्हणून के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने काम पहिले.
या व्याख्यानाचे प्रास्तविक महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.विजय ठाणगे यांनी केले.तसेच मान्यवरांचे स्वागत व परिचय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक प्रा.डॉ.वासुदेव साळुंके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,प्रा.रवींद्र जाधव आदींचे सहकारी लाभले.