मनोरंजन
एरोबिक्स स्पर्धेत समता स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड
कोपरगाव (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या जीवनात विविध शारीरिक कसरतींना वाव मिळावा, त्यात नैपुण्य प्राप्त व्हावे याहेतूने स्पोर्टस एरोबिक्स फिटनेस व हिप बॉल असोसिएशन नाशिक यांच्या तर्फे १५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या दरम्यान मीनाताई ठाकरे स्टेडियम या ठिकाणी स्पोर्टस एरोबिक्स फिटनेस या स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश मिळवुन ३१ पदकांची कमाई केली आहे.
एरोबिक्स हा आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकार आहे त्यात विशेषत: शारीरिक कसरतींचा कस लागतो. हा क्रीडा प्रकार संगीतावर सादर केला जातो. त्यात वैयक्तिक व सांघिक कामगिरीला वाव मिळत असतो. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १२ ते १९ वयोगटातील विद्यार्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने व नियोजनबद्ध कौशल्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. १२ वर्षाखालील वयोगटात सर्व कु.अन्वी दुबे, कार्तिकी भागडे, नंदिनी वर्मा, जिया पारख, आनंदी जगताप, राजेश्वरी तांबे, ओवी जपे, अन्वी उंबरकर, पालवी देवतकर, विशाल दाडवाणी आदि विद्यार्थानी १० सुवर्ण पदके मिळवून उत्तम कामगिरी केली आहे. १४ वर्षा खालील वयोगटात ४ कास्य पदके मिळाली. या वयोगटात सर्व कु.संमती सारडा, कस्तुरी चापनेरकर, गार्गी डोखे, चि.समर्थ सोनावणे, मोहित रूपांनी, शाश्वत संकुशले यांनी उत्तम कामगिरी केली.
एरोबिक्स हा आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकार आहे त्यात विशेषत: शारीरिक कसरतींचा कस लागतो. हा क्रीडा प्रकार संगीतावर सादर केला जातो. त्यात वैयक्तिक व सांघिक कामगिरीला वाव मिळत असतो. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १२ ते १९ वयोगटातील विद्यार्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने व नियोजनबद्ध कौशल्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
१७ वर्ष वयोगटातील स्टेप्स प्रकारामध्ये सर्व चि.भूषण भट्टड, समर्थ मोरगे, रुद्राक्ष सारडा, अनुज पिपाडा, देवांग भट्टड, वेदांत भड आणि मुलींमध्ये कु.उन्नती भवर, आर्या भुसारे, केशर रामचंदानी, नंदिनी कलंत्री, हर्षदा लोकचंदाणी आदींनी ६ सुवर्ण पदे मिळविली तर १९ वर्षे वयोगटात सर्व कु.अदिती रावलिया, अदिती राजपूत यांनीही उत्कृष्टपणे कौशल्ये सादर करून ५ सुवर्ण पदकांची कमाई केली.
या यशस्वी विद्यार्थांना समता इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा शिक्षक सर्वश्री.प्रकाश जैस्वाल, तेजस सोलट यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक ओमप्रकाश कोयटे, व्यवस्थापकिय संचालिका स्वाती संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन उप प्राचार्या शैला झुंजारराव, उप प्राचार्य विलास भागडे आदींनी अभिनंदन केले आहे.या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील विविध वयोगटातील ५८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.