नगर जिल्हा
तळेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन -रमेश दिघे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे उच्च न्यायालयाच्या आदेशाने अकोले तालुक्यातील बंद केलेल्या कालव्याचे काम तातडीने सुरु करावे या प्रमुख मागणीसाठी निळवंडे कालवा कृती समितीने केलेल्या “रास्ता रोको” आंदोलनातील शेतकऱ्यावरील खोटे गुन्हे पोलीस प्रशासनाने तातडीने मागे घ्यावे अन्यथा कृती समिती पंधरा दिवसानंतर तीव्र आंदोलन करील असा इशारा समीतीचे माजी उपाध्यक्ष रमेश दिघे यांनी नुकताच एका आंदोलनात बोलताना दिला आहे.
निळवंडे कालवा कृती समितीने दि.२७ मे २०१९ रोजी तळेगाव दिघे येथे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने अकोलेतील बंद कालव्यांचे काम सुरु करण्यासाठी जलसंपदा व पोलीस प्रशासनास निवेदन देऊन “रास्ता रोको आंदोलन”केले तरीही ढोंगी राजकीय नेत्यांच्या चुकीच्या आदेशाने आंदोलनात सामील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचे पोलिसांनी दिलेल्या नोटिसींमुळे उकतेच उघड झाले आहे.हि अत्यंत निंदनीय घटना आहे त्याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे समोर काल निळवंडे कालवा कृती समितीने सकाळी साडे अकराच्या सुमारास समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे,उत्तमराव जोंधळे,विठ्ठलराव पोकळे,भिवराज शिंदे,माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे, कौसर सय्यद,दगडू रहाणे, अशोक गांडूळे,अशोक गाढे,वाल्मिक भडांगे,आप्पासाहेब कोल्हे,अशोक जोंधळे,सचिन मोमले, आबासाहेब सोनवणे,बाळासाहेब सोनवणे,रावसाहेब मासाळ, अमोल साब्दे, नितीन साब्दे,अशोक जोंधळे,चंद्रकांत कार्ले, वाल्मिक भडांगे,शब्बीर सय्यद,शशिकांत शब्दे,भाऊसाहेब साब्दे आदी प्रमूख कार्यकर्त्यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या निधी मंजूर नसताना पुढारी जनतेत खोटे बोलून निधीची तरतूद झाल्याचे खोटे सांगून आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहे.त्या भुलथापावर कोणीही विश्वास ठेऊ नये.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एकोणतीस ऑगष्ट रोजी या प्रकल्पाच्या कालव्यांना निधीची तरतूद कधी आणि कोठून करणार व कालवे कधी पूर्ण करणार या बाबत प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश दिले आहे.सोळा सप्टेंबर रोजी केंद्र व राज्य सरकारने एक आठवड्याची मुदत मागून घेतली आहे.इकडे राज्याचे मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री मात्र बाराशे कोटीच्या निधीची तरतूद केल्याची जाहीर बतावणी करीत आहे.तरी या खोटारड्या राजकीय नेत्यापासून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सावध रहावे. निधीसाठी कालवा कृती समिती न्यायिक मार्गाने विधीज्ञ अजित काळे यांच्या मार्फत रास्त प्रयत्न करत असून या न्यायिक लढ्यामुळेच केंद्र व राज्य सरकारकडून या प्रकल्पाच्या निधीसाठी सतरा मान्यता प्राप्त झालेल्या आहेत.व निधीचे अधिकृत प्रतिज्ञापत्र पुढील आठवड्यात प्राप्त होणार आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि,निळवंडे कालवा कृती समिती 182 गावांच्या हितासाठी लढा देत आहे.मात्र काही कुटील राजकारणी मात्र कालव्यांच्या कामात सातत्याने अडथळे आणत आहे.दहा ऑगष्ट 2014 रोजी शेतकऱ्यांवर याच प्रवरा परिसरातील कुटील नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून खडकेवाके येथे हल्ला करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता.मात्र कालवा कृती समितीची चळवळ अजून जोमाने वाढली आहे.सध्या निधी मंजूर नसताना पुढारी जनतेत खोटे बोलून निधीची तरतूद झाल्याचे खोटे सांगून आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहे.त्या भुलथापावर कोणीही विश्वास ठेऊ नये.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एकोणतीस ऑगष्ट रोजी या प्रकल्पाच्या कालव्यांना निधीची तरतूद कधी आणि कोठून करणार व कालवे कधी पूर्ण करणार या बाबत प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश दिले आहे.सोळा सप्टेंबर रोजी केंद्र व राज्य सरकारने एक आठवड्याची मुदत मागून घेतली आहे.इकडे राज्याचे मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री मात्र बाराशे कोटीच्या निधीची तरतूद केल्याची जाहीर बतावणी करीत आहे.तरी या खोटारड्या राजकीय नेत्यापासून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सावध रहावे. निधीसाठी कालवा कृती समिती न्यायिक मार्गाने विधीज्ञ अजित काळे यांच्या मार्फत रास्त प्रयत्न करत असून या न्यायिक लढ्यामुळेच केंद्र व राज्य सरकारकडून या प्रकल्पाच्या निधीसाठी सतरा मान्यता प्राप्त झालेल्या आहेत.व निधीचे अधिकृत प्रतिज्ञापत्र पुढील आठवड्यात प्राप्त होणार आहे.निवडणुकीच्या आधी मतांवर डोळा ठेऊन खोटी उदघाटने करणाऱ्या बहुरूपीयांवर कोणीही विश्वास ठेऊ नये.लोकसभेच्या निवडणुकीत याचा वाईट अनुभव आला आहे.या नेत्यांनीच तळेगाव दिघे येथील आंदोलनानंतर शेतकऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यास अधिकाऱ्यांवर दबाव आणून शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे करण्यास भाग पाडले असल्याचा आरोपही दिघे यांनी शेवटी केला आहे.पुढील पंधरा दिवसात गुन्हे मागे घेतले नाही तर या पेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा रुपेंद्र काले,गंगाधर रहाणे, संजय गुंजाळ,कौसर सय्यद,उत्तमराव जोंधळे यांनी शेवटी दिला आहे.