कोपरगाव तालुका
शंभर वर्षे जुन्या मारुती मंदिराला परजणे यांच्या रूपाने जीर्णोद्धाराचा उजाळा
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मणवाडी येथील पुरातन मारुती मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांच्या सहकार्याने चार लाख वीस हजारांचा निधी मंजूर झाला असून त्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी नुकताच घेतला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,संवत्सर परिसरातील लक्ष्मणवाडी येथे के. जे. सोमय्या कारखाना येण्यापूर्वी चे जुन्या पिढीतील लोकांनी लोकवर्गणीतून मारुती मंदिर बांधले होते त्यात मंदिरात जागा कै. रखमजी कोंडाजी भाकरे यांनी दिली व लोकवर्गणी साठी कै. कारभारी मांडवडे नाशिककर, कै. मनुलाल रुखुमासा खानापुरे उर्फ सावजी बाबा, कै. माधवराव काळे, कै. बाबुराव गायकवाड कै. कारभारी फेफाळे बाबा,कै. गोपाळा आगवन, कै. नानासाहेब काळे, कै. पंढरीनाथ रोहम अशा जुन्या जाणत्या लोकांनी सुसज्ज मंदिर बांधले होते मंदिर आजही सुस्थितीत आहे परंतु ते जुने झाल्याने जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी मंदिर हे जुने झाले असून आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे असे गावकऱ्यांना सांगितले त्याप्रमाणे ग्रामस्थांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांच्या प्रयत्न व माध्यमातून अहमदनगर जिल्हा परिषदेने 4लाख 20 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व ग्रामस्थांनी तेवढाच निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी नुकतेच मंदिराचे भूमिपूजन संवत्सर गावाचे माजी सरपंच चंद्रकांत लोखंडे, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे, केशवराव भाकरे, किरण मेहेत्रे, लक्ष्मणराव परजणे, बंडु नाना आचारी, शिवाजीराव गायकवाड, बाळासाहेब दहे, निवृत्ती, लोखंडे, शिवाजीराव वरगुडे, खंडू पाटील फेफाळे, रमेश गायकवाड, सुभाष डरांगे, बंडू बडे, माणिकराव भाकरे, मच्छिंद्र भोसले, भाऊसाहेब पवार, अशोक चांदे, अण्णा खरात, विठ्ठल रानडे व असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत व हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.