जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

लोकशाहीर साठे यांनी संपूर्ण जीवनात संघर्ष अनुभवला-पाटील

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण जीवनात संघर्ष अनुभवला आणि आपल्या साहित्यातून रेखाटला असून अण्णा भाऊंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची गाथा आहे असे गौरवोङ्गार जेष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कै.वि.तू.बागुल “दलित मित्र” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कोपरगाव येथे लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या वेळी मातंग समाजाच्या सामाजिक,राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ पुरस्कार वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल होते.

सदर प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,अँड.नितीन पोळ,राजेंद्र बागुल,शिर्डीचे कमलाकर कोते,सचिन खेडलेकर,पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर,शरद त्रिभुवन,निसार शेख,सुजल चंदनशिव,अकबर शेख,सोमनाथ अहिरे,विनोद वाकळे,प्रवीण शेलार,पी डी सोळसे,राजेंद्र चंदनशिव,किरण सोळशे,अजय विघे,नितीन डोंगरे,दिलीप कोपरे,माजी.नगरसेवक जंगु मरसाळे,संजय पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कै.वि.तू.बागुल “दलित मित्र” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तर कै.मच्छीन्द्र राक्षे यांच्या स्मरणार्थ सागर आहेर यांना,’फकिरा युवा पुरस्कार’ तर शिर्डी येथील कै.प्रयोगाबाई त्रिभुवन यांच्या स्मरणार्थ मुक्ता साळवे शिक्षिका पुरस्काराने वैशाली उल्हारे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.नितीन पोळ यांनी केले त्यांनी यावेळी सांगितले की,”महापुरुषांच्या शोषण मुक्त समाजकरिता लोक स्वराज्य आंदोलना च्या वतीने सामाजिक कार्यकर्त्याना प्रेरणा मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.सूत्रसंचलन शरद त्रिभुवन यांनी केले तर उपस्थितांचे आभार सोमनाथ म्हस्के यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close