जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…या तहसीलची ‘मे’ मह‍िन्यात नाश‍िक व‍िभागात ‘सर्वोत्कृष्ट कामग‍िरी’

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

नाश‍िक व‍िभागीय महसूल आयुक्तालयाकडून दर मह‍िन्याला व‍िभागातील उत्कृष्ट अध‍िकारी व कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली जात असून यात राहाता तहसील कार्यालयाच्या सर्वोत्कृष्ट महसूली कामग‍िरीसाठी कुंदन ह‍िरे यांचे ‘मे २०२२’ या मह‍िन्यातील नाश‍िक व‍िभागातील,’उत्कृष्ट तहसीलदार’ म्हणून नाव जाहीर करण्यात आले आहे.नाशिक व‍िभागीय (महसूल) आयुक्तालयाच्या अध‍िकृत संकेतस्थळावर सदर यादी प्रस‍िध्द करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौकुक होत आहे.

“उपव‍िभागीय अध‍िकारी गोव‍िंद श‍िंदे यांचे मार्गदर्शन,तसेच उपव‍िभागीय व तहसील कार्यालयातील सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे राहाता तहसील कार्यालय महसूली कामग‍िरीत सातत्य ट‍िकवून आहे.सर्वसामान्य जनतेला लोकाभ‍िमुख सेवा देण्यास प्रशासन कट‍िबध्द आहे”-तहसीलदार कुंदन ह‍िरे,राहाता तहसील कार्यालय.

नाश‍िक व‍िभागीय महसूल आयुक्तालयाकडून दर मह‍िन्याला प्रस‍िध्द केल्या जाणाऱ्या यादीत उपज‍िल्हाध‍िकारी,तहसीलदार,गट-क व गट-ड कर्मचारी अशा २ अध‍िकारी व २ कर्मचाऱ्यांची त्या त्या मह‍िन्यातील कामग‍िरीवर उत्कृष्ट अध‍िकारी,कर्मचारी म्हणून नावे घोष‍ीत करण्यात येतात.

राहाता तहसीलमध्ये मे मह‍िन्यात म‍िशन वात्सल्य अंतर्गत ३१६ बालसंगोपन प्रकरणे,१८२ बाल न्यायनिधी प्रकरणे व १५३ संजय गांधी न‍िराधार योजनेची लाभ प्रकरणे मंजूर करणेत आली. पोटखराबा क्षेत्र लागवडीखाली आणणेकामीच्या विशेष शिबीरामध्ये दाखल २२४ प्रकरणांपैकी ६१ प्रकरणे अंतिम आदेशासाठी दाखल आहेत.जमीन महसूल थकबाकी मध्ये २५ लाख ९३ हजार रूपयांची वसूली करणेत आली आहे.१२५६ आदिवासी विद्यार्थ्यांना दाखले देण्यात आले आहेत. शासकीय वसुली मे २०२२ मह‍िन्यात ३० लाख ८८ हजार रूपये शासकीय वसूली करण्यात आले आहे. या महसूली कामग‍िरीच्या आधारावर तहसीलदार ह‍िरे यांचे मे मह‍िन्यातील ‘उत्कृष्ट तहसीलदार’ म्हणून नाव जाहीर झाले आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close