न्यायिक वृत्त
कायदे विषयक जनजागृतीचा प्रत्येक व्यक्तीने लाभ घ्यावा-अँड.पाईक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधी सेवा समिती व कोपरगाव वकील संघ यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक शिबिराचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव वकील संघाचे सदस्य अड.उत्तम पाईक यांनी खिर्डी गणेश येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“सर्व सामान्य जनतेला दैनंदिन जीवनात अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते मात्र योग्य वेळी योग्य सल्ला व मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक सर्वसामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहतात मात्र स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने गावोगावी जाऊन कायदेविषयक जनजागृती करण्यात येत आहे”-अड्.उत्तम पाईक,सदस्य कोपरगाव वकील संघ.
कोपरगाव तालुका विधी सेवा समिती,कोपरगाव वकील संघ व अंचलगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अंचलगाव येथील हनुमान मंदिरात विधी साक्षरता शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खिर्डी गणेश ग्रामपंचाहयतीच्या सरपंच सरला चांदर या होत्या. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सदर प्रसंगी संजीवणीचे संचालक विश्वास महाले,भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम,खिर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सोपान चांदर,अड्.नितीन पोळ,उमेश शिंदे,मच्छीन्द्र वाघ,राजेंद्र खण्डिझोड, मारुती आवारे,सदाशिव वराडे,चांदभाई शेख,ग्रामसेवक बागले तसेच ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान या निमित्ताने अंचलगाव,बोलकीं,ओगदी आदी ठिकाणी हे शिबिर उत्साहात संपन्न झाले आहे.
या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सर्व सामान्य जनतेला दैनंदिन जीवनात अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते मात्र योग्य वेळी योग्य सल्ला व मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक सर्वसामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहतात मात्र स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने गावोगावी जाऊन कायदेविषयक जनजागृती करण्यात येत असून विधी सेवा समिती ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होणार असून न्यायापासून वंचित राहण्यापेक्षा या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अड्,पाईक यांनी शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव वकील संघाचे अँड.नितीन पोळ,अँड.नागरे,अँड.मोकळ यांनी विविध कायद्याची सविस्तर माहिती दिली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक नितीन पोळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी सरपंच सोपान चांदर यांनी मानले आहे.