न्यायिक वृत्त
‘त्या’ खुनातील आरोपींना पोलीस कोठडी,एक आरोपी अद्याप फरार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-नागपूर महामार्गावर असलेल्या दहिगाव बोलका नजीक रेल्वे उड्डाण पुलानजीक असलेल्या संवत्सर शिवारात असलेल्या गुरुराज एच.पी.पेट्रोल पंपावर व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले व्यवस्थापक भोजराज बापूराव घनघाव (वय-४०) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी साहिल व्हिजास गुंजाळ (वय-२१) व आदित्य गंगाधर रूचके या दोन जणांना कोपरगाव शहर पोलिसांनी विविध ठिकाणाहून अटक करून आज कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांना ०४ जुलै पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर अद्याप जेतीन अशोक सातदिवे हा सावळीविहिर येथील आरोपी फरार असून ‘तो’ पोलिसांना हुलकावणी देत आहे.
दरम्यान आज साहिल गुंजाळ,आदित्य रूचके दोन आरोपींना शहर पोलिसांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचे समोर दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान हजर केले होते.त्यावेळी सरकारी वकील व आरोपींचे वकील यांच्या युक्तिवाद ऐकून न्यायालयाने या दोन्ही आरोपीना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर अद्याप तिसरा आरोपी जेतीन सातदिवे हा फरार आहे.तो सावळीविहीर येथील ग्रामपंचायत सदस्य पारडे यांचा भाचा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-नागपूर महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाजवळ असलेल्या गुरुराज एच.पी.पेट्रोल पंप असून त्याचे अवघ्या पंधरा-सोळा दिवसापासूर्वी उदघाटन झाले हॊते.त्यावर मयत इसम भोजराज घनघाव हे व्यवस्थापक म्हणून रुजू झाले होते.दरम्यान दि.२९ जून रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास एका बजाज पल्सर या दुचाकीवरून (क्रं.एच.एच.१७ सी.डब्ल्यू.९१०४) तीन आरोपी त्या ठिकाणी खाली उतरले होते.त्यांचे पैंकी एकाचे अंगात चॉकलेटी व लाल पांढ-या रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेले होते.लाल पांढरे रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेला इसम फिर्यादिकडे येवुन त्याने फिर्यादिस धक्काबुक्की करुन फिर्यादि अमोल धोंडीराम मोहिते (वय-२५) या कामगारांच्या कानाखाली मारली होती हि बाब व्यवस्थापक भोजराज बापुराव घनघाव (मयत) यांनी आपल्या केबिनमधून पाहिली होती.त्यांनी या भांडणात येवुन फिर्यादिस मारहाण करणारे अनोळखी इसमांस,”तु माझे माणसाला मारहाण का केली ? असा जाबसाल केला होता.त्याचा त्याला त्याचा राग आल्याने व राखाडी रंगाचे शर्ट घातलेला इसम व चॉकलेटी रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने,”त्यांस मारुन टाक सोडु नको” असे म्हणाले तेव्हा पांढरे व लाल रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेला त्या अनोळखी इसमाने त्याचे कमरे जवळुन धारदार चाकु काढुन व्यवस्थापक भोजराज घनघाव,रा.दहेगाव बोलका यांची गंचाडी धरुन चाकुने त्यांचे पोटात व खांदयावर वार करुन त्यास जिवे ठार मारले होते.
दरम्यान सदर घटना कोपरगाव शहर पोलिसांना कळाल्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांनी व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी त्याकडे धाव घेतली होती.व त्या आरोपींचा शोध सुरु केला होता.त्या चलचित्रण उपलब्ध झाले होते.त्यानुसार त्यांनी केलेल्या कारवाईत साहिल गुंजाळ,आदित्य रूचके व जेतीन सातदिवे असे तीन आरोपी निष्पन्न झाले होते.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३१०/२०२३ भा.द.वि.कलम ३०२,३४ प्रमाणे अज्ञात तीन आरोपी विरुद्ध मध्यरात्री १२.०५ वाजता फिर्यादी अमोल धोंडीराम मोहिते या जखमीच्या फिर्यादीच्या जबाबावरून दाखल केला होता.
त्यात त्यांनी तातडीने केलेल्या कारवाईत आदित्य गंगाधर रूचके यासह साहिल व्हिजास गुंजाळ या दोघांना पोलिसांनी काही तासात शिर्डी आणि नाशिक येथून जेरबंद केले होते.तर यातील तिसरा आरोपी जेतीन अशोक सातदिवे हा सावळीविहिर येथील रहिवासी असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता.अद्याप तो पोलिसांना सापडलेला नाही.
दरम्यान आज या दोन आरोपींना शहर पोलिसांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचे समोर दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान हजर केले होते.त्यावेळी सरकारी वकील व आरोपींचे वकील यांच्या युक्तिवाद ऐकून न्यायालयाने या दोन्ही आरोपीना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढील तपास शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट दिली होती व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामराव ढिकले हे पुढील तपास करत आहेत.