निवड
…या ठिकाणी विविध मान्यवरांचा सत्कार संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात विविध क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या मान्यवर गुणवंताचा सत्कार साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने भाजपचे माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी नुकताच मोठ्या उत्साहात केला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.सदर सत्कार गोवर्धंनगिरी महाराज यांचे हस्ते केला असून यात रयत शिक्षण संस्थेच्या नांदगाव येथील महाविद्यालयात प्राचार्य पदी नियुक्ती झालेले देविदास झालटे व रयतचे लाईफ मेंबर असलेले सूरेश बोळींज यांच्यासह विविध मान्यवरांचा समावेश आहे.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

निवारा कोपरगाव येथील शिक्षक देविदास झाल्टे यांची रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकोरा तालुका नांदगाव या शाखेत प्राचार्यपदी नेमणूक झाली आहे त्याबद्दल सत्कार केला आहे तर सुरेश बोळींज यांचा रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबर पदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा संपन्न झाला आहे.
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या निवारा येथील निवारा मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवासह विविध सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत असतात.यावेळी त्यांनी विविध गुणवंतांचा सत्कार केला आहे.त्यात निवारा कोपरगाव येथील शिक्षक देविदास झाल्टे यांची रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकोरा तालुका नांदगाव या शाखेत प्राचार्यपदी नेमणूक झाली आहे त्याबद्दल सत्कार केला आहे तर काशिनाथ लवाटे यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कोपरगाव येथे मुख्याध्यापक पदी निवड केल्याबद्दल,प्राध्यापक नितीन साळवे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून पी.एच.डी.प्राप्त केली त्याबद्दल सत्कार केला आहे.तर माजी शिक्षण सुरेश बोळीज यांची रयत शिक्षण संस्था सातारा या शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबरपदी नेमणूक झाल्याबद्दल तर विष्णू हाडके हे आपल्या अकाउंटंट पदावरून येवला नगरपरिषद येथून सेवानिवृत्त झाले आहे.सुनील तारू यांची सहाय्यक फौजदार पदी नेमणूक झाली आहे.याशिवाय तर कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी प्रभारी मुख्याध्यापक व गुरुकुल प्रमुख शहाजी सातव यांची पांगरी या ठिकाणी पर्यवेक्षकपदी नेमणूक झाली आहे.चि.सार्थक किशोर कुलकर्णी यांची आंतरविद्यालय क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघात निवड झालेली आहे त्याबाबत हा सत्कार सोहळा संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी रामनाथ आव्हाड,सतीष जाधव,सतीष गर्जे,माधवराव पोटे,अनिल जगताप,सुरेश नेरे,राजेंद्र जैन,सुमित भोंगळे,विष्णुपंत गायकवाड,श्री.पवार सर,श्री वाघ सर,श्री होन सर, सिद्धार्थ पाटणकर,संतोष बैरागी,दशरथ सर्वान,सोहम सातपुते,प्रथमेश सोनवणे,कृष्णा गवारे,ओम उदावंत,अक्षय ठाणगे,अजित इनामके आदी उपस्थित होते.