जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

माजी मंत्री विखे यांच्या गटाचा…या गावात उडाला धुव्वा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्याच गावात विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे.राष्ट्रवादीने लोणी खुर्द सहकारी सेवा सोसायटीत विखे गटाचा १३ शून्य असा दारुण पराभव करत २० वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले आहे. नूतन संचालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या पॅनलचे नेतृत्व सरपंच जनार्दन घोगरे यांनी केले आहे.

दोन वर्षांपूर्वी संपन्न झालेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत देखील सरपंच जनार्दन घोगरे यांच्या पॅनलने विखे गटाचा पराभव करत ग्रामपंचायतीवर आपल्या विजयाचा झेंडा डौलाने फडकवला होता. आता पुन्हा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घोगरे यांनी दणदणीत विजय मिळवून २० वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले. विखे गटाला पराभवाचा सामना करावा लागल्याने संपूर्ण नगर जिल्ह्यात या निकालाची चर्चा होत आहे.

आ. राधाकृष्ण विखे पाटील नेतृत्व करत असलेल्या शिर्डी मतदार संघात सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत.यातील अनेक सोसायट्या बिनविरोध करण्यात विखे यांना यश आले. मात्र आता विखे पाटलांना त्यांच्याच लोणी गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनार्दन घोगरे यांनी जोरदार धक्का दिला आहे.लोणी खुर्द गावात राष्ट्रवादीच्या जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन मंडळाने बाजी मारत विखे गटाचा १३ शून्य असा मोठा पराभव करत विजय संपादित केला. या विजयानंतर परिवर्तन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे.
दोन वर्षांपूर्वी संपन्न झालेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत देखील सरपंच जनार्दन घोगरे यांच्या पॅनलने विखे गटाचा पराभव करत ग्रामपंचायतीवर आपल्या विजयाचा झेंडा डौलाने फडकवला होता. आता पुन्हा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घोगरे यांनी दणदणीत विजय मिळवून २० वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले. विखे गटाला पराभवाचा सामना करावा लागल्याने संपूर्ण नगर जिल्ह्यात या निकालाची चर्चा होत आहे.या मंडळाचे अध्यक्ष जनार्दन पाटील घोगरे यांचे व त्यांच्या नूतन संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close