जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

‘त्या’खुनातील आरोपींचा,’न्यूजसेवा’ने व्यक्त केलेला अंदाज निघाला खरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण वीस कि.मी.अंतरावर असलेल्या आपेगाव ग्रामपंचायत हद्दीत पूर्वेस गावापासून सोमवारी रात्रीच्या सुमारास रहिवासी असलेले शेतकरी दत्तात्रय भुजाडे व त्यांची पत्नी राधाबाई भुजाडे हे आपल्या घराच्या छतावर झोपलेले असताना अज्ञात आरोपींनीं त्यांचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली होती.त्या आरोपीना शोधण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना यश आले असून,”न्यूजसेवा पोर्टल”वर आमच्या प्रतिनिधीने व्यक्त केलेला कयास खरा ठरला असून आरोपी हे मयताच्या विहिरीवर काम करणारे पढेगाव येथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे मजूरच निघाले असून त्यांची नावे अजय छंदू काळे,(वय-१९)तर दुसरा हिंगणी येथील अमित कागद चव्हाण (वय-२०),तर जंतेश छंदु काळे (वय-२२) अशा तिघांनी हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरी नुसार आरोपी हा अजय काळे हा असून तो पळून जाण्याच्या तयारीत आहे.त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता तो राहत्या घरापासून पळून जाऊ लागला होता.त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले होते.त्यास पोलिसी हिसका दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला त्याने यातील आरोपीची नावे विचारले असता त्याने पढेगाव ता.कोपरगाव येथील अजय छंदू काळे,जंतेश काळे तर तिसरा हिंगणी येथील,अमित कागद चव्हाण अशा तिघांनी हा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस तीळवणी गावाच्या ईशान्य दिशेस साधारण अडीच कि.मी.अंतरावर आपेगाव हे खेडे आहे.गावाच्या पूर्वेस साधारण एक कि.मी.अंतरावर आपल्या शेतात घर करून रहात असलेले शेतकरी दत्तात्रय भुजाडे व त्यांची पत्नी हे राधाबाई भुजाडे दोघे राहत होते.त्यांना दोन मुले असून ते उच्च शिक्षित असून पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करत आहेत.त्यांनी आपल्या आई आणि वडिलांना सोमवार दि.३० मे पासून फोन करत होते.मात्र त्यांचा फोन ते उचलत नव्हते.त्यांना आधी काही शेताच्या कामात असतील अशी शंका होती.
मात्र दोन दिवस होऊनही ते आपला फोन उचलत नाही म्हणून शंका आली होती.म्हणून त्यांनी आज आपले चुलत भाऊ पोपट भुजाडे यांना फोन लावला.व आपले आई आणि वडील फोन उचलत नाही काय भानगड आहे.म्हणून तू घरी जाऊन स्थिती जाऊन बघ अशी विनंती केली होती.सदर चुलत बंधू हे घरी गेले असता तेथे त्यांचे घर आतून बंद होते.म्हणून त्यांनी खिडकीतुन डोकावून पाहिले मात्र आत त्यांना कोणताही सुगावा लागला नाही.म्हणून त्यांनी शेजारी असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावर जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला.त्यात ते दोघे पति-पत्नी मृत अवस्थेत आढळून आले होते.त्यांनी या कामी या धक्कादायक घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना दिली होती.

दरम्यान या ठिकाणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून या प्रकरणी पुणे स्थित मयताची मुले आल्यावर या प्रकरणी गेलेल्या मुद्दे मालाची चौकशी केली असता त्यात आरोपीनी कपाटाची उचकपाचक करून त्यातील ०१ लाख ९० हजार किमतीचे दागिने लंपास केले होते.या प्रकरणी मयताचा मुलगा फिर्यादी जालिंदर दत्तात्रय भुजाडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.नोंद क्रं.१९७/२०२२ भा.द.वि.कलम ३०२,३९७,३९४ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

या दरोड्यातील आरोपी बाबत व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला आहे हीच ती बातमी

यातील अजय काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.क्रं.१/२०२१ भा.द.वि.कलम ३२३,३२४,५०४,५०६ असून दुसरा आरोपी अमित चव्हाण यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यासह कन्नड औरंगाबाद जिल्हयात दोन गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले आहे.तर जंतेश काळे याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाणामारी,जबरी चोरीचे दरोडा या सारखे गुन्हे दाखल आहे.या गंभीर गुंह्यातील आरोपींना अवघ्या तीन दिवसात जेरबंद केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा ,व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचे कौतुक होत आहे.

या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील,पोलीस अधीक्षक मनोज पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अग्रवाल आदीं पोलीस अधिकांऱ्यानी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे सह तीन पोलीस पथके नेमून तपास सुरु केला होता.

दरम्यान पोलिसांना गुप्त खबरी मार्फत माहिती मिळाली की,”यातील आरोपी हा अजय काळे हा असून तो पळून जाण्याच्या तयारीत आहे.त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता तो राहत्या घरापासून पळून जाऊ लागला होता.त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले होते.त्यास पोलिसी हिसका दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला होंता.त्याने यातील आरोपीची नावे विचारले असता त्याने पढेगाव ता.कोपरगाव येथील अजय छंदू काळे,तर दुसरा हिंगणी येथील,अमित कागद चव्हाण,तर जंतेश छंदु काळे अशा तिघांनी हा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे.त्या प्रमाणे पोलिसांनी तपास केला असता ते निष्पन्न झाले आहे.

दरम्यान यातील अजय काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.क्रं.१/२०२१ भा.द.वि.कलम ३२३,३२४,५०४,५०६ असून दुसरा आरोपी अमित चव्हाण यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यासह कन्नड औरंगाबाद जिल्हयात दोन गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले आहे.तर जंतेश काळे याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाणामारी,जबरी चोरीचे दरोडा या सारखे गुन्हे दाखल आहे.
या गंभीर गुंह्यातील आरोपींना अवघ्या तीन दिवसात जेरबंद केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा ,व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचे कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close