जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीसह मुलगा गायब,कोपरगावात दोन गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली फिर्यादी इसमाची अल्पवयीन मुलगी (वय-१६ वर्ष ६ महिने ) हिला अज्ञात इसमाने काल सकाळी पहाटे १० वाजेच्या सुमारास फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्यादी मुलीचे वडील (वय-५५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असून दुसऱ्या घटनेत कोळपेवाडी येथून त्याच दिवशी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कोळपेवाडी मोतीनगर येथून एक १६ वर्षीय मुलगा गायब झाला असल्याची फिर्याद त्याच्या आईने (वय-३६) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोळपेवाडीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान दुसऱ्या एका घटनेत कोळपेवाडी येथून त्याच दिवशी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कोळपेवाडी मोतीनगर येथून एक १६ वर्षीय मुलगा गायब झाला असल्याची फिर्याद त्याच्या आईने (वय-३६) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.दोन्ही घटनेत मुलगा मुलगी अल्पवयीन आहे त्या मुळे हा योगायोग आहे.नियोजित कट आहे याबाबत कोळपेवाडी आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आह

जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिसदेखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागेदेखील घेतले जातात.मात्र यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.त्यामुळे कोळपेवाडी व परिसरात खळबळ उडाली आहे.

त्या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलीचे वडील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असून ते सहकारी संस्थेत नोकरी करत आहे.तेथे ते आपल्या पत्नी,आई,वडील,व आपल्या सतरा वर्षीय मुलीसह आपल्या छोट्या घरात राहतात.शनिवार दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने आपली मुलगी काही तरी प्रलोभन दाखवून अज्ञात करणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेली आहे.त्यामुळे त्यांनी आजूबाजूस शोध घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे शोध घेऊन कंटाळून त्यांनी अखेर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे सह सहाय्यक पो.नि. सुरेश आव्हाड,पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या दोन्ही घटनेची आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३८१,२८२ /२०२२ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.कोकाटे,आर.टी.चव्हाण आदी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close