जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्वतःच्या प्रभागातील कामेही नामंजूर करणाऱ्या कोल्हे गटाचा दुतोंडीपणा-नगराध्यक्ष

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आपल्याच प्रभागातील कामे नामंजूर करणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा दुटप्पी पणा उघड झाला असून अनेकांनी आपल्याशी संपर्क साधून कामे करण्याची गळ घातल्याचा आरोप कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

“आमच्या प्रभागात काम करण्यासाठी शिफारस द्या”असे कोल्हे गटाच्या नगरसेवकाचे “पत्र” कुणीही माझ्याकडे आले तरी ते पत्र बघायला मिळेल.कामाचे बिल मिळावे म्हणून बेशरमपणे चकरा मारणारेच शहाजोगपणे पत्रकार परिषदेत बोलत असून अशांना पोसणारे नेतेच शहर विकासाला घातक आहे”-विजय वहाडणे, अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विविध रस्त्यांसह एकतीस कामे राजकीय कारणातून अडवून धरल्याने याबाबत वाद आता जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला आहे.आता तेच काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले असताना आज कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी एक प्रसिद्धिपत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्या दुटप्पी पणाचे वाभाडे काढले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”गत चार वर्षात सर्वच प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत अजून काही होणार आहेत.आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी बहुमताचा गैरवापर करून शहर विकासाची कामे नामंजूर करणारा कोल्हे गट राजकिय द्वेषाने पिसाळलेला आहे.शहरातील मोक्याचे रस्ते झाले तर नगराध्यक्ष विजय वहाडणे व आ.आशुतोष काळे यांना श्रेय मिळेल म्हणून विरोध करण्याच्या नादात कोल्हे गटाने स्वतःच्याच प्रभागातील पंचवीस कामेसुद्धा नामंजूर करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.खडीकरण,डांबरीकरण,काँक्रीटीकरण,पेव्हर ब्लॉक,गटार इ.अनेक कामे नगरसेवकांच्या व नागरिकांच्या मागणीवरूनच करायचे सर्वानुमते ठराव करून करण्याचे ठरले होते.पण नेत्यांच्या आदेशावरून सदरची कामे नामंजूर करण्यात आली.नगरपरिषदेच्या निवडणुकीआधी कामे होऊच नयेत यासाठी कुटिल डावपेच सुरू आहेत.ई-निविदा न काढता छोटी छोटी कामे केली,पेव्हर ब्लॉकची जास्त कामे केली अशा तक्रारी करणारेच आपल्याला व मुख्याधिकाऱ्याना भेटून सतत अशा कामांसाठी तगादा करत आहे.माझ्याशी खाजगीत गोड बोलणारे आदेश आल्यावर मात्र आरडाओरड करतात.आजही या बाबत आपल्याकडे कोणीही येऊन फाईल बघावी.एका नगरसेवकाने ठेकेदाराकडे कार्यारंभ आदेश असूनही खडीकरण करण्याचे काम मात्र स्वतःच घेतले असे निदर्शनास आलेले आहे.संबंधित नगरसेवकाचे नांव जाहिर करावे असे वाटत असल्यास त्यांनी आपल्याला तसे सांगावे त्यांची मनीषा पूर्ण केली जाईल असे आव्हान अध्यक्ष वहाडणे यांनी दिले आहे.”आमच्या प्रभागात काम करण्यासाठी शिफारस द्या”असे कोल्हे गटाच्या नगरसेवकाचे “पत्र” कुणीही माझ्याकडे आले तरी ते पत्र बघायला मिळेल.कामाचे बिल मिळावे म्हणून बेशरमपणे चकरा मारणारेच शहाजोगपणे पत्रकार परिषदेत बोलत असतात.अशांना पोसणारे नेतेच शहर विकासाला घातक आहे असा आरोप त्यांनी केला आहे.मोक्याचे रस्ते नामंजूर केलेच,पण स्वतःच्याच प्रभागातील कामेही नामंजूर करून कोल्हे गटाच्या काही नगरसेवकांनी अकलेचे दिवाळे काढलेले सिद्धच झालेले आहे.अंदाजपत्रक जास्त आहे म्हणून कामे नामंजूर करणाऱ्यानी ५ ते ७ लाखांची कामेही का नामंजूर केली ? त्याला कारण केवळ “नेत्यांचा आदेश”असल्याचा आरोपही त्यांनी शेवटी केला आहे.या दुटप्पीपणा बाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close