जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अर्थकारण

पतसंस्था नफ्यात युवक संचालकांचा सहभाग हवा-कोयटे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सहकारी पतसंस्थांनी युवक सभासदांच्या ठेवीवर जास्त व्याजदर देण्याखेरीज संस्थेच्या नफ्यात देखील संचालकांचा सहभाग असावा म्हणजे ‘बिझनेस करिअर’ म्हणून देखील युवा पिढी पतसंस्थांकडे आकर्षित होतील असे प्रतिपादन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“महाराष्ट्रातील व देशातील सहकारी चळवळीमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार खात्याने विशेष प्रयत्न करावे यासाठी देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे प्रयत्न करू”-आ.श्वेताताई महाले,चिखली विधानसभा मतदार संघ.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त शिर्डी येथील राज्य पतसंस्था फेडरेशनचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र येथे युवा सहकार परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.प्रसंगी वरील ठराव मंजूर करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव,अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे,समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे,अलिबाग येथील आदर्श पतसंस्थेचे संचालक अभिजीत पाटील,अ,नगर येथील व्यंकटेश मल्टीस्टेट पतसंस्थेचे संचालक अभिनाथ शिंदे,नांदेड येथील गोदावरी अर्बन पतसंस्थेचे संचालक धनंजय तांबेकर,वसई येथील वसई प्रगती पतसंस्थेचे संचालक प्रकाश भोईर,माजलगाव येथील मंगलनाथ मल्टीस्टेट पतसंस्थेचे संचालक रविंद्र कानडे,जालना येथील महालक्ष्मी पतसंस्थेचे संचालक दिपक तुपकर,अ.नगर येथील जनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक अक्षय नवले,नाशिक येथील अर्थ पतसंस्थेचे संचालक नचिकेत पाटील,छत्रपती मल्टीस्टेट पतसंस्थेचे संचालक संतोष भंडारी,कोल्हापूर येथील पिहीताश्रव पतसंस्थेचे संचालक रमेश मिठारे,सांगली येथील जनसेवा पतसंस्थेचे संचालक संदीप माळी,पुणे येथील डोळसनाथ पतसंस्थेच्या संचालिका तस्लिम शिकलकर आदिंसह महाराष्ट्रातील विविध पतसंस्थांचे युवा अध्यक्ष,युवा पदाधिकारी,युवा अधिकारी,युवा कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सहकार चळवळीमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विशेष प्रयत्न करावे.प्रत्येक सहकारी चळवळीतील पतसंस्थेच्या संचालक मंडळात युवा संचालकांसाठी राखीव जागा असाव्यात तसेच ट्रेनी संचालकांची ही निवड करण्यात यावी.संस्थेच्या सभासदांमध्ये जी संस्था युवक सभासदांचे प्रमाण वाढवेल त्या संस्थेला सहकार विभागाच्या लेखा परीक्षणात विशेष गुण द्यावेत असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

दरम्यान अलिबाग येथील आदर्श पतसंस्थेचे युवा संचालक अभिजीत पाटील यांनी पतसंस्था चळवळीत मार्केटिंगचे महत्व,अ.नगर जिल्ह्यातील व्यंकटेश मल्टीस्टेट पतसंस्थेचे युवा संचालक अविनाश शिंदे यांनी पतसंस्था चळवळीत आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व,अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे युवा संचालक यांनी मी अनुभवलेली स्कॉटलंडची स्कॉटलंडची सहकार परिषद तर कोल्हापूर जिल्ह्यातील पिहिताश्रव पतसंस्थेचे युवा संचालक रमेश मिठारे यांनी पतसंस्था चळवळीत कर्मचाऱ्यांचा सहभाग या विषयाच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close