दळणवळण
…या रस्त्यासाठी निधी मंजूर !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या वारी-बाबतरा (प्रजिमा-२०३) या रस्त्याच्या सुधारणा करण्यासाठी महायुती शासनाने ०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.त्यामुळे सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागासाठी महत्वाचा ठरणारा वारी ते बाबतरा या रस्ता पूर्व भागासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.त्यासाठी निधी मिळावा यासाठी ग्रामस्थानी कोपरगाव मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे यांचेकडे मागणी केली होती.त्यातूनच वारी-बाबतरा रस्ता (प्रजिमा-२०३) या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.त्यामुळे ग्रामस्थांची मोठी ओरड आहे.त्यात गोदावरी नदी काठी तर विचारायची सोय नाही.वाळूचोरांनी थैमान घातले आहे.त्यामुळे त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही परिणामी त्यात रस्त्यांचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यातील वारी ते बाबतरा या रस्ता पूर्व भागासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.त्यासाठी निधी मिळावा यासाठी ग्रामस्थानी कोपरगाव मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे यांचेकडे मागणी केली होती.त्यातूनच वारी-बाबतरा रस्ता (प्रजिमा-२०३) या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.त्याबद्दल ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.



