जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

संस्थानचे जनसंपर्क अधिकारी यादव यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साई बाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे काल मध्यरात्री निधन झाले आहे.यादव यांच्यावर गेल्या आठवडाभरा पासून नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.काल त्यांची तब्बेत ढासळल्या नंतर त्यांच्या वर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती.त्यांच्या निधनान्स सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.मोहन यादव यांनी आधी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत प्रारंभीच्या काळात नोकरी केली होती त्या नंतर त्यांनी साई संस्थान मध्ये जनसंपर्क विभागात आपली सेवा साईबाबा चरणी देऊ केली होती.गेल्या सोळा वर्षांपासून यादव साई संस्थानच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत होते.

स्व.मोहन यादव यांनी आधी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत प्रारंभीच्या काळात नोकरी केली होती त्या नंतर त्यांनी साई संस्थान मध्ये जनसंपर्क विभागात आपली सेवा साईबाबा चरणी देऊ केली होती.गेल्या सोळा वर्षांपासून यादव साई संस्थानच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत होते.त्यांच्याच माध्यमातून साईभक्त के.व्ही.रमणी यांनी संस्थानला ११० कोटीच्या देणगीतून साई आश्रम इमारत बांधून दिली होती. त्यातील काही इमारतीत आज कोविड हॉस्पिटल सुरू आहे.यादव यांचा देशविदेशात मोठा जनसंपर्क होता.त्यांनी यातून संस्थानला विशेषतः रुग्णालयासह विविध विभागांना अनेक मोठ्या देणग्या मिळवून दिल्या.त्यांचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील वावी नजीक वल्हेवाडी आहे.ते आपल्या मित स्वभावामुळे देशभरातील साई भक्तात ओळखले जात होते.
यादव यांनी लिहिलेल्या श्री साईचरित्र दर्शन या पुस्तकाचा जवळपास बारा भाषेत अनुवाद झालेला आहे.यादव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close