जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

घनकचरा ठेका परवडत नसल्याची ठेकदाराची तक्रार !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

श्रीरामपूर-(प्रतिनिधी)

अनेक वादळी चर्चेनंतर श्रीरामपुर नगरपालीकेचा घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका अखेर सुधर्म एन्हॉर्नमेंट सोल्युशन प्रायव्हेट ली.या कंपनीला देण्यात आला होता.मात्र हा ठेका आपल्याला परवडत नसून महीन्याला सुमारे सात लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने घनकचरा व्यवस्थापनाचे काम बंद करावे लागेल असे पत्र दिल्याने नगरपालीकेपुढे आता नव्याने पुन्हां एकदा शहराच्या स्वच्छतेचा पेच ऊभा राहीला आहे.तर विरोधकांनी ठेकेदाराला सभेपुढे बोलवा मग विचार करू असा पवित्रा घेतल्याने पुनः एकदा घनकचरा व्यवस्थापन ठेक्यावरून नवा राजकीय अध्याय सुरू होणार आहे.

“सदर ठेकेदाराने सर्वसाधारण सभेत आपण या रकमेत ठेका घ्यायला तयार आहोत असे जाहीरपणे सांगीतले होते.त्यावेळी मात्र नगराध्यक्षा म्हणाल्या तुम्हांला हा ठेका परवडेल का ? म्हणुनच ठेकदार ठेका परवडत नाही असे म्हणतो की काय ? असा शंकास्पद प्रश्‍न केला.त्याला पुढील सभेत बोलवा आम्हीं त्याला विचारु.ठेका तर त्याने विचार करुन घेतला होता मग आताच त्याला परवडत नसल्याचा साक्षात्कार कसा झाला ?करण ससाणे,उपनगराध्यक्ष

सदरचे सविस्तर वृत्त असे की,माहे मे महीन्यात नगरपालीकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका सदगुरु बहुउद्देशीय संस्था तळोदा जि.नंदुरबार या संस्थेस ३१ लाख ८३ हजार २१ रुपयांना देण्यावरुन बरीच वादग्रस्त मतमतांतरे झाले होते.परत नव्याने निवीदा बोलावण्यात आल्या होत्या.शेवटी झालेल्या सभेत २३ जुन रोजी हा ठेका सुधर्म कंपनीला १४ व्या वित्त आयोगातील प्राप्त निधीतून २५ लाख ३६ हजार ८०८ रुपयांना माहे जुन २०२० ते मे २०२१ या कालावधीसाठी दिला होता.त्याचे कामही सुरु झाले होते.मात्र ठेकेदार कंपनीने ऑगष्ट महिन्यात व १५ सप्टेंबर रोजी पत्र देऊन काम बंद करण्याचा इशारा देत पालीकेपुढे पेच निर्माण केला आहे.त्यांनी नगरपालीकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,प्रशासकीय मान्यतेत दैनंदीन कचर्‍याचे वजन २१ टन दर्शवण्यात आले होते,मात्र प्रत्यक्षात आपण ४२ ते ५० टन कचरा गोळा करतो.त्यामुळे महीन्याला ३ ते ३ लाख २५ हजार रुपयांची तफावत पडत आहे.

पुर्वीची ठेकेदार संस्था कर्मचार्‍यांना जे काही वेतन देत होती.ते परवडत नसल्याने नवीन ठेक्यात वेतन वाढवून मिळावे अशी कर्मचार्‍यांची मागणी होती.ते वाढीव वेतन द्यावे एवढाच आपला आग्रह होता.त्यामुळे आपणही त्याला या वेतनासाठी आग्रही राहून ठेका परवडेल का विचारले होते.त्याने सर्व विचार करुन ठेका मान्य केला आहे.आपण फक्त कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसाठी प्रयत्नशील होतो त्यामुळे विरोधकांचे आरोप निरर्थक आहे-अनुराधा आदिक नगराध्यक्षा

यापुर्वीच्या ठेकेदार संस्थेत १९० ते २०० कर्मचारी कार्यरत होते.आपणास मात्र सध्या 235 कर्मचारी कामावर असुन शिवाय त्यांचे वेतनही वाढवले आहे.त्याचे तीन ते तीन लाख पन्नास हजार वाढीव वेतन द्यावे लागत आहे.खतप्रक्रीया प्रकल्पातही १५ कर्मचारी जास्त घेतले असून तेथेही दोन लाख रुपये गुंतवले आहे.कचरा संकलन वाहनांच्या इंधन व इतर खर्चात प्रतिदिन प्रती वाहन ५१० रुपये तफावत होत आहे.आदी कारणे देत संस्थेस महीन्याला ३१ लाख ५० हजार रुपये खर्च येत आहे.त्यामुळे मुळ ठेक्याची रक्कम व प्रत्यक्षात खर्चाची रक्कम यात सुमारे सात लाख रुपये तोटा सहन करावा लागत आहे.एकतर ही रक्कम वाढवून द्यावी अन्यथा नवीन निवीदा प्रक्रीया करावी असे सुचवण्यात आले आहे.दरम्यान आरोग्य विभागाने याबाबत मुख्याधिकार्‍यांना कार्यालयीन टिपणी सादर केली असून यावर ते काय निर्णय घेतात याकडे ठेकेदार संस्थेचे भवितव्य अवलंबून आहे.

दरम्यान याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी ढेरे म्हणाले की,”ठेकदार संस्थेचे पत्र आले आहे,मात्र हा विषय सभागृहापुढे घ्यावा लागेल व नवीन निवीदा प्रक्रीयेबाबात चर्चा करावी लागेल.ठेकेदाराने सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून ठेका घेतला आहे.आता परवडत नाही म्हणून अर्ज आला आहे.पुढील सभेत हा विषय घेऊ तोपर्यंत ठेकेदार संस्थेला काम करावेच लागणार आहे.”अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close