जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

शासकीय क्रीडा स्पर्धेसाठी तालुका क्रीडा समिती जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकतीच कोपरगाव व राहाता तालुक्याची जिल्हा क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठीची सहविचार सभा प्रवरा कन्या विद्या मंदिर , लोणी येथे संपन्न झाली असून यात तालुका क्रीडा समिती जाहीर केली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या प्रसंगी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी चे प्रशिक्षण प्रवीण बानावलीकर यांनी दिले.जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिल्ले यांनी उपस्थित क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करतांना क्रीडा शिक्षकाची भूमिका ही क्रीडा स्पर्धासाठी महत्वाची असते.असे सांगुन सर्वानी ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका भरून तालुका,जिल्हा स्पर्धेत सहभागी घ्यावे असे आवाहन केले आहे.

या सभेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिल्ले,खो.खो.चे राज्य क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर,कबड्डीचे राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे,विशाल गर्जे,तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे,नारायण शेळके,सुधाकर निलक,रमेश पटारे,संजय अमोलिक,रमेश येवले,प्रा आकाश लकारे,प्रा मिलिंद कांबळे,रवींद्र नेद्रे,नितिन सोळके,रोहित महाले,राजेंद्र देशमुख,अशोक गायकवाड,किरण बोळीज आदी मान्यवर क्रीडा शिक्षक उपस्थित होते .

या सहविचार सभेमध्ये क्रीडा समितीचे मार्गदर्शक मकरंद कोऱ्हाळकर हे श्रीमान गोकुळचंद विदयालयांचे मुख्याध्यापक झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी भागश्री बिल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

या नंतर तालुका क्रीडा समितीचे माजी अध्यक्ष धनंजय देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा समिती स्थापन करण्यात आलीत्यातील पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्षपदी नितिन निकम (डॉ.सी एम.मेहता कन्या विद्या मंदिर ),उपाध्यक्ष पदी प्रा.शिवराज पाळणे (संजीवनी ज्युनिअर कॉलेज),उपाध्यक्ष पदी अजित पवार (आत्मा मलिक क्रीडा संकुल),सचिव पदी निलेश बडजाते (श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय),सहसचिव पदी अनुप गिरमे (संत ज्ञानेश्वर इंग्लिश मेडिअम स्कूल ),संपर्क प्रमूख पदी शिवप्रसाद घोडके (संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूल )
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या सर्वाचे अहमदनगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप घोडके,सुभाष पाटणकर,प्रा.अंबादास वडांगळे,राजेंद्र पाटणकर आदीनी अभिनंदन केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोहोकडे यांनी केले तर आभार शिवप्रसाद घोडके यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close