शैक्षणिक
कोपरगावात…या विद्यालयात भोंडला दांडिया उत्सव संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला व दांडीया उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला होता.त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे.
शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे.नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो कोपरगाव शहरात हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्याला श्रीमान गोकुलचंद विद्यालय अपवाद नाही.
त्यानी या वर्षी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी भोंडला या कार्यक्रमात विविध पोशाखात आनंद लुटला.सर्व मुलींनी विविध गीताच्या तालावर नृत्य करीत आनंद घेतला.शिक्षिकांनी पारंपरिक भोंडला गीत सादर केले.
सदर प्रसंगी उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड व सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भोंडला दांडियाला खुप महत्त्व आहे. जवळजवळ सर्वच ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो असे पर्यवेक्षिका यु.एस.रायते मॅडम यांनी सांगितले.
या प्रसंगी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संदीप अजमेरे आदीनी सर्व विद्यार्थीनी व शिक्षिकांचे अभिनंदन केले आहे.