जाहिरात-9423439946
खेळजगत

जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परिक्षेत समता स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्हा विज्ञान अध्यापन संघ आयोजित विज्ञान स्पर्धा परिक्षेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा राखत या स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्वतरकौतुक होत आहे.

या विज्ञान स्पर्धा परिक्षेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता ६ वी मधील चि.पुष्कर धनंजय महाडिक व अविक शिवंकार मंडल या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकवला तर इयत्ता ६ वी मधील अंश गणेश शिंदे, इयत्ता इ. ९ वी मधील पुर्वा सचिन कोठारी, अद्वैत सुधाकर मापारी या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे.

यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व पारितोषिके देण्यात आली. पारितोषिकांचे स्वरूप स्मृतीचिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र होते. विज्ञान विषयाचे शिक्षक अनिस शेख व विज्ञान विषयाच्या इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या या यशाबद्दल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संस्थेच्या विश्वस्त स्वाती कोयटे, संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन, उपप्राचार्य विलास भागडे उपप्राचार्या शैला झुंजारराव सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी आदीनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close