जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर युगप्रवर्तक व्यक्तिमत्व-डॉ.सुभाष रणधीर.

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून शुद्ध संस्कृती व आदर्श मानवी समूह स्थापन करण्यासाठी बौद्ध तत्वज्ञानाचा समावेश राज्यघटनेत केला असला तरी जगभरातील प्रगत देशांच्या घटनांचा सार त्यात असून भारताची ओळख टिकवून ठेवली असल्याने ते युगप्रवर्तक व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन डॉ. सुभाष रणधीर यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयांच्या सांकृतिक विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे हे होते.

याप्रसंगी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. रामदास पवार, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.आर.एस. झरेकर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.व्ही.बी.निकम,जुनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.डी.डी.सोनवणे महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युग प्रवर्तक राष्ट्रप्रेमी, आदर्श संशोधक, पत्रकार, अर्थतज्ञ, मानव उद्धारक, ज्ञानी व शिक्षणप्रेमी, अथक मेहनती, स्पष्टवक्ते होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे यांनी महामानवाचे विचार-मूल्य जतन करण्यासाठी नेहमी महापुरुषांच्या चरित्र ग्रंथांचे वाचन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.प्रकाश सावंत यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. कैलास महाले यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close