जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

भाजपास खड्यात घालणाऱ्यांचा आपण बंदोबस्त करू-वहाडणेंचा इशारा !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

नगर जिल्ह्यातील फक्त आपल्या फायद्यासाठी पक्षांचा वापर करून घेणाऱ्यां साखर व मद्यसम्राट नेत्याना आपण भाजपात घेऊ नका असे वारंवार बजावूनही त्याना पक्षात घेऊन आपल्याच पक्षाला खड्ड्यात घालणाऱ्या भाजपातील घरभेद्यांचा आपण बंदोबस्त करू असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये नुकताच दिला आहे.

एकनिष्ठ कार्यकर्त्यांना पक्षविरोधी भूमिका नाईलाजाने घेण्यास भाग पाडायचे व स्वतः मात्र एकनिष्ठ म्हणून पदांचे तुकडे वाटून घ्यायचे.या आपमतलबी कारणाने जिल्ह्यात भाजपाची दुरावस्था झालेली दिसते.अजूनही वेळ गेलेली नाही,आता तरी जागे व्हा.सगळेच गोडबोले-होयबा एकत्र येऊन पक्षाचे भले करू शकत नाहीत.उलट ते जनतेच्या शिसारी आले आहेत-विजय वहाडणे.

राज्यात गत महिन्यात संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत गत लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठी पडझड झाल्याने राज्यापेक्षा वाईट अवस्था नगर जिल्ह्यातील भाजपाची झाली असून त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या आहेत. राज्यात भाजपाला सर्वाधिक १०५ जागा मिळूनही राज्यात असंतुष्ट शिवसेनेने राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गळ्यात हात घालून विळ्याभोळ्याची मोट बांधली आहे.त्यामुळे राज्यात राज्यस्तरीय नेत्यांच्या विरोधात अडचणीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे.राज्यातील असंतुष्ट कार्यकर्ते भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या झेंड्याखाली एकत्र येऊ लागल्याने राज्यातील भाजप नेत्यांना अंतर्मुख होण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.नगर जिल्ह्यातील भाजपचे बुजुर्ग नेते व कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी भाजपाची वाट लावणाऱ्या व आपल्याच मस्तीत राहणाऱ्या पक्षांतर्गत नेत्यांच्या विरोधात रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या विधानाला जिल्ह्यात महत्व आले आहे.

पक्ष आयारामांच्या दावणीला बांधू नका असे आपण १० ते १२ वर्षांपासून अनेकदा जाहीर वर्तमानपत्रातून बजावले होते.पण पक्षातील काही दलालांनी आपल्याला पक्ष संघटनेपासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला.या प्रवृत्तीला विरोध म्हणूनच आपण कोपरगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक नाईलाजाने अपक्ष लढविली. व महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य मिळवून नगराध्यक्ष झालो.भाजपाच्या मुखपत्रात (मनोगत) आपला भाजपाचे नगराध्यक्ष म्हणून उल्लेखही झाला होता.

त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि,लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात भाजपा शिवसेना युतीचे दोनही उमेदवार निवडून आले.पण विधानसभा निवडणुकीत मात्र पानिपत झाले. पक्ष आयारामांच्या दावणीला बांधू नका असे आपण १० ते १२ वर्षांपासून अनेकदा जाहीर वर्तमानपत्रातून बजावले होते.पण पक्षातील काही दलालांनी आपल्याला पक्ष संघटनेपासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला.या प्रवृत्तीला विरोध म्हणूनच आपण कोपरगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक नाईलाजाने अपक्ष लढविली. व महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य मिळवून नगराध्यक्ष झालो.भाजपाच्या मुखपत्रात (मनोगत) आपला भाजपाचे नगराध्यक्ष म्हणून उल्लेखही झाला होता.या निवडणुकीत आपण अपक्ष निवडणुकीचे हत्यार उपसले म्हणून वर्तमानपत्रात पक्षातून आपली हकालपट्टीच्या बातम्या झळकल्या होत्या.मात्र,” तुमच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही” असे आपल्याला प्रदेश भाजपाचे कार्यालयीन सचिव मुकुंदराव कुलकर्णी सांगितले होते.पण जिल्हा भाजपाच्या एका टोळीने आपल्याला आजही जाणीवपूर्वक बाजूला ठेवले आहे.सहकार सम्राटांच्या दावणीला पक्ष बांधून मनमानी करणाऱ्या प्रवृत्तीना आपण जाहीरपणे ईशारा देऊन ठेवतो कि, तुमच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणार नसेल तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण जाहीरपणे पक्षविरोधी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही.त्यासाठी संपुर्ण जिल्ह्यात फिरून या टोळीच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली तरी मागेपुढे पहाणार नाही.विधानसभा निवडणुकीतही आपण याच कारणांमुळे उमेदवारी केली होती.याचा खुलासाही त्यांनी या निमित्ताने विधानसभा निवडणुकी नंतर प्रथमच केला आहे.एकनिष्ठ कार्यकर्त्यांना पक्षविरोधी भूमिका नाईलाजाने घेण्यास भाग पाडायचे व स्वतः मात्र एकनिष्ठ म्हणून पदांचे तुकडे वाटून घ्यायचे.या आपमतलबी कारणाने जिल्ह्यात भाजपाची दुरावस्था झालेली दिसते.अजूनही वेळ गेलेली नाही,आता तरी जागे व्हा.सगळेच गोडबोले-होयबा एकत्र येऊन पक्षाचे भले करू शकत नाहीत.उलट ते जनतेच्या शिसारी आले आहेत.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात केवळ सभासद नोंदणीचे नाटक करायचे व याच प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर काहींनी दलाली करायची हे आता तरी बंद करा.अन्यथा अशा प्रवृत्तीची नावे तालुक्या-तालुक्यातील प्रामाणिक व स्वाभिमानी कार्यकर्ते जाहीर केल्याशिवाय रहाणार नाही असा इशाराही त्यांनी शेवटी दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close