खेळजगत
शालेय पुणे विभागिय तलवारबाजी स्पर्धेमध्ये संत जनार्दन स्वामी महर्षी स्कुलचे यश.
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
शालेय पुणे विभागिय तलवारबाजी स्पर्धा जिल्हाक्रीडा कार्यालय अहमदनगर व अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने शालेय पुणे विभागिय तलवारबाजी स्पर्धा नुकत्याच अहमदनगर जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी कामगिरी करत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत पुणे, अहमदनगर, सोलापुर, पिंपरी चिंचवड येथील 500 खेळाडुनी सहभाग घेतला होता.यामध्ये 14 वर्षातील मुले वयोगटात अर्णव प्रशांत वाबळे याने इपी या प्रकारात कास्य पदक तर 17 वर्षे मुले वयोगटात पार्थ महेश साळुंके याने इपी या प्रकारात सुवर्णपदक तर फाॅईल या प्रकारात रजत पदक मिळविले तसेच 15 वर्षातील मुलांच्या गटात शर्वाय किरण सुराळकर याने कास्यपदक मिळविले. या तीनही खेळाडुंची लातुर येथे होनाऱ्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडुंचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण सर्व विश्वस्त प्राचार्य राजेंद्र पानसरे पर्यवेशिका जे.के.दरेकर, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अशोक दुधारे, सचिव डाॅ.उदय डोंगरे, कार्याध्यक्ष प्रा. प्रकाश काटुळे जिल्हाध्यक्ष प्रा. दिलीप घोडके, सचिव प्रा. संदेश भागवत यांनी अभिनदन केले आहे. या यशस्वी खेळाडुनां विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके, गणेश वाकचौरे यांचे मार्गदर्शन लाभले होते.