जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सडे गावी मुलाला वाचविण्यास गेलेला इसम स्वतः मृत्युच्या दाढेत,सर्वत्र हळहळ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील सडे ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवार दि.चार ऑक्टोबर रोजी राजेंद्र धनवटे हा तरुण पाण्यात पोहण्यास गेला असता त्याला नीट पोहता येत नसल्याने तो बुडत असल्याची खबर गावात वाऱ्यासारखी पोहचली हि घटना ऐकताच त्याच गावातील शेतमजूर गोपीनाथ पवार यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करताच धावत जाऊन पाण्यात उडी मारली व बुडणाऱ्या तरुणाला वाचविले मात्र एका अवघड क्षणी ते पाण्याला पडलेल्या भोवऱ्यात सापडून दिसेनासे झाले ते दुसऱ्या दिवशीच मृत अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्या बलिदानाचे सर्वत्र कौतुक व त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील सडे ग्रामपंचायत हद्दीत चार ऑक्टोबर रोजी त्याच गावातील एक तरुण राजेंद्र जगन्नाथ धनवटे हे गोदावरी नदीच्या पाण्यात पाय घसरून पडला असल्याची खबर त्याच गावात शेतमजुरी करणाऱ्या गोपीनाथ सावळेराम पवार यांना कळाली त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांना पोहता येत असल्याने त्यांनी आपले पोहण्याच्या कलेचे सर्व कसब पणाला लावून बुडणाऱ्या तरुणाला नदीच्या काठावर आणून वाचविण्यात यश मिळवले पण त्याच वेळेस नदीला सध्या जास्त पाणी असल्याने त्या ठिकाणी अचानक पाण्याच्या प्रवाहाला भोवरा पडला आणि त्यात तरुणांचा जीव वाचविणारे गोपीनाथ पवार हे गायब झाले असल्याची घटना तेथील शेतकरी व शेतमालक यांनी पाहिली होती.त्यांनीच या बाबत तातडीने हालचाल करून या बाबतची खबर गावातील जमा झालेल्या नागरिकांना व नागरिकांनी ती कोपरगाव तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या पथकाला कळविली त्यांनी कामगार तलाठी यांना तातडीने घटनास्थळी पाठवले होते.पथकाने भेट देऊन खूप शोधाशोध करूनही पाणी जास्त व खोल असल्याने उपयोग झाला नाही अखेर रात्री उशीर झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली.दुसऱ्या दिवशी पाच ऑक्टोबर रोजी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी पुन्हा सकाळीच उठून गोपीनाथ पवार यांची शोधाशोध सुरु केली असता त्यांचा मृतदेह सकाळी सहाच्या सुमारास दगडाच्या कडेला पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले होते. त्यांना तातडीने उपस्थित ग्रामस्थांच्या सहाय्याने बाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याना मृत घोषित केले आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी मयत गोपीनाथ पवार यांचा मुलगा किरण पवार यांच्या खबरीवरून आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू दप्तरी र. नं.67/2019 सी.आर.पी.सी.174 प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री म्हस्के हे करीत आहेत.दरम्यान दुसऱ्या तरुणांचा जीव वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून प्राणाची आहुती देणाऱ्या या ग्रामस्थांचा व शेतमजूराचा सर्वत्र गौरव होत असून हि घटना त्यांच्या मृत्यू पच्छात गौरव प्राप्त करून देणारी ठरली असून त्यांचा शासनाने एखाद्या सरकारी पुरस्कारासाठी शिफारस करावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close