निधन वार्ता
मुक्ताबाई शिंदे यांचे निधन
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग (शास्त्री) शिंदे (वय-६५)यांच्या भावजई व राधाकृष्ण शिंदे यांच्या पत्नी मुक्ताबाई शिंदे यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुली,एक मुलगा,आदी परिवार आहे.त्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका गयाबाई पांडुरंग शिंदे यांच्या जाऊ बाई होत्या.
स्व.मुक्ताबाई शिंदे या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून संवत्सर आणि परिसरात परीचित होत्या.त्यांच्यावर संवत्सर येथील गोदावरी तीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी संजीवनी सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव,संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे आदिसंह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाबद्दल महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णा परजणे आदिनी दुःख व्यक्त केलं आहे.