जाहिरात-9423439946
धार्मिक

कोपरगाव तालुक्यात…येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
सुरेगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सुरेगाव येथे सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी महोत्सव व जगद्गुरु तुकाराम महाराज बीजोत्सव तसेच एकनाथ महाराज जलसमाधी सोहळ्यानिमित्त सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा ध्वजारोहण समारंभ सिद्धेश्वर देवस्थानचे मंहत गोवर्धनगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी भागवताचार्य कावेरीताई घुमरे ह.भ.प.निवृत्ती महाराज चव्हाण (ठाणगावकर) ह.भ.प.रेखाताई काकड (निराळे) ह.भ.प.अंबादास महाराज गोरे (रुई) ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली गायकवाड(धुळगाव) डॉ.जलाल महाराज सय्यद (करंजीकर) यांनी कीर्तन करून समाज प्रबोधन केले आहे.

गोदावरीच्या तीरावर वसलेले सुरेगाव ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेल्या हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण संपन्न झाले आहे.

सदर प्रसंगी ह.भ.प.काशिनाथ महाराज मोरे,दिलीप महाराज डहाळे,विनायक महाराज वाघ,तसेच सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे,ज्येष्ठ नेते मोहनराव वाबळे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक विलास वाबळे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब,शरद पवार पतसंस्थेचे संचालक सुदाम वाबळे, सुरेगाव सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत वाबळे,उपाध्यक्ष शंकर कदम,पांडुरंग वाबळे,शिवाजी यशवंत वाबळे,उद्योजक समीर कुलकर्णी,पोलीस पाटील संजय वाबळे,रवींद्र देवकर,भागवत कदम,कैलास बोरनर,श्रीधर कदम,दशरथ कदम,शिवभक्त दीपक निंबाळकर,गोपीनाथ सोनवणे,सोपान सोनवणे,विष्णू सोनवणे,कु्षी मित्र,कैलास कदम,सचिन वाबळे,शिवभक्त शंकर वाबळे,गोकुळ गिरी,सचिन दवंगे,संजय निंबाळकर,दिंगबर कदम,किरण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी भागवताचार्य कावेरीताई घुमरे ह.भ.प.निवृत्ती महाराज चव्हाण (ठाणगावकर) ह.भ.प.रेखाताई काकड (निराळे) ह.भ.प.अंबादास महाराज गोरे (रुई) ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली गायकवाड(धुळगाव) डॉ.जलाल महाराज सय्यद (करंजीकर) यांनी कीर्तन करून समाज प्रबोधन केले आहे.तसेच ह.भ.प.उषाताई बाळासाहेब देशमुख (धामोरीकर)व सिंधुताई बोरनर (सुरेगाव) ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ उपक्रम सुरू आहे.अखंड हरिनाम सप्ताहाचे सांगता व काल्याचे किर्तन दि.१३ मार्च २०२३रोजी स.१० वा.दत्ता महाराज देवळीकर (चाळीसगाव) यांच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.

याप्रसंगी सुरेगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळ गायनाचार्य मृदुंगाचार्य यांच्या अथक परिश्रमातून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close