धार्मिक
कोपरगावातून होणार यावर्षी होणार…या पालखीचे प्रस्थान !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आगामी ‘राम नवमीच्या’ पार्श्वभूमीवर तहसील मैदानात बुधवार दि.२२ मार्च ते २९ मार्च रोजी सायंकाळी ०७ वाजता नाशिक येथील मातृमंदिर सेवा संस्थानचे अध्यक्ष व आचार्य महंत श्री कालिकानंद महाराज यांच्या सुस्राव्य वाणीतून व कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरीजी महाराज व आत्मा मालिक ध्यानपीठाचे सद्गुरू आत्मा मालिक माऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आदिशक्ती महात्म्य’ कथा निरूपण कार्यक्रम संपन्न होत आहे.या कार्यक्रमाचा शहर व तालुक्यातील नारिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुंबादेवी तरुण मित्र मंडळाच्या वतीने केले आहे.
मुंबादेवी तरुण मित्र मंडळाच्या वतीने निमंत्रण देण्याचे काम सुरु आहे आज कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरीजी महाराज,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले आदींना निमंत्रण देण्यात आले आहे.त्यावेळी उपस्थित मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.
यापूर्वी मुंबादेवी तरुण मित्र मंडळाच्या वतीने कोपरगाव शहरात बाबा महाराज सातारकर यांचे,’संत चरित्र्य’,सह रामराव महाराज ढोक यांचे,’रामायण’,केशव महाराज उखळीकर यांचे,’श्री कृष्ण चरित्र्य’,’भागवत कथा’,व ‘दत्त महात्म्य’,विवेकबुवा गोखले यांचे,’दत्त माहात्म्य’,देवगोपाल शास्त्री यांचे,’शिव महापुराण’,गणेशानंद महाराज यांचा,’कैवल्याचा पुतळा’,स्व.अपर्णाताई रामतीर्थकर यांचे,’समाज प्रबोधन’,गत वर्षी अनुराधा दीदी यांचे,’बालाजी भगवान चरित्र्य’,हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे.
मुंबादेवी तरुण मित्र मंडळाच्या वतीने कोरोना साथीच्या नंतर सालाबादा प्रमाणे दर वर्षी रामनवमीचा कार्यक्रम संपन्न होत असतो.त्या निमित्ताने दरवर्षी सर्वात मोठा पालखी सोहळा शिर्डी साठी प्रस्थान करत असतो.यावर्षी चांदीच्या पालखीत हा गुरुवार दि.३० मार्च रोजी संपन्न होत आहे.दुपारी ०३.४५ वाजता सोहळा संपन्न होत आहे.तत्पूर्वी आठवडाभर आधी विविध धार्मिक कार्यक्रम लोकवर्गणीतून संपन्न होत असतात.यापूर्वी बाबा महाराज सातारकर यांचे,’संत चरित्र्य’,सह रामराव महाराज ढोक यांचे,’रामायण’,केशव महाराज उखळीकर यांचे,’श्री कृष्ण चरित्र्य’,’भागवत कथा’,व ‘दत्त महात्म्य’,विवेकबुवा गोखले यांचे,’दत्त माहात्म्य’,देवगोपाल शास्त्री यांचे,’शिव महापुराण’,गणेशानंद महाराज यांचा,’कैवल्याचा पुतळा’,स्व.अपर्णाताई रामतीर्थकर यांचे,’समाज प्रबोधन’ तर गत वर्षी अनुराधा दीदी यांचे,’बालाजी भगवान चरित्र्य’,संपन्न झाले आहे.तर सन-२०२० ते २०२२ पर्यंत कोरोना काळात यात दुर्दैवाने खंड पडला होता.मात्र यावर्षी हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
दरम्यान या निमित्त विविध मान्यवरांना मुंबादेवी तरुण मित्र मंडळाच्या वतीने निमंत्रण देण्याचे काम सुरु आहे.आज कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरीजी महाराज,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले आदींना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.