जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिवजयंती उत्सव,सेनेच्या दोन गटातील तिढा अखेर सुटला !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात आगामी काळात तिथीनुसार संपन्न होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा सेनेच्या दोन गटातील तिढा अखेर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी वाकडे बोट केल्यावर सूटला असून आता दोन वेगवेगळ्या वेळेस सदर कार्यक्रम संपन्न होणार असून त्यात पहिला मिरवणुकीचा मान सेनेचे शहराध्यक्ष सनी वाघ यांच्या गटाला मिळाला असून त्यांनी सायंकाळी ६ ते ०८ वाजे दरम्यान आपली मिरवणूक आटोपून घेतल्यानंतर माजी नगराध्यक्ष राजेन्द्र झावरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रात्री ०८ ते १० या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.त्यामुळे दोन गटातील तिढा अखेर सुटला असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने सेनेचे शहर प्रमुख सनी वाघ यांचे संपर्क साधला असता त्यांनी,”आमचा मिरवणूक कार्यक्रम सायंकाळी ५.३० पासून डॉ.आंबेडकर मैदानापासून सुरु होऊन तो रात्री ०८ वाजेच्या आत विघ्नेश्वर चौकाच्या पुढे घेण्याचे ठरलं असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.तर याबाबत माजी शहराध्यक्ष कलविंदर दडियाल यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आमच्या गटाचा कार्यक्रम वाघ गटाची मिरवणूक ७.३० वाजेच्या पुढे विघ्नेश्वर चौकाच्या पुढे गेल्यावर सुरु होणार असल्याचे सांगून दुजोरा दिला आहे.

पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून दोन्ही कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द करण्याचा इशारा दिल्यावर बैठक रद्द करून टाकली होती.काही काळाने दोन्ही गट ठिकाणावर आले आहे.अखेर त्यात तडजोड म्हणून दोन्ही गटांनी रवींद्र कथले यांच्या माध्यमातून विक्रांत झावरे व कलविंदर दडियाल यांनी तडजोड करण्याची भूमिका घेतली होती.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे.हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसा निमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.त्यानुसार,महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस,आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात.शासकीय शिवजयंती गत महिन्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.मात्र कोपरगाव शहरात तिथी प्रमाणे ती आगामी फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी शुक्रवार दि.१० मार्च रोजी संपन्न होत आहे.या पार्श्व भूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याने शिवसेनेच्या दोन अंतर्गत गटांची बैठक पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित केली होती.त्यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवणार आहे.तर व शहराध्यक्ष सनी वाघ यांचा गट हा विघ्नेश्वर चौकातून आपली मिरवणूक सुरुवात करणार आहे.मात्र वेळेबाबत दोन गटात कार्यक्रम स्थळावरून वाद निर्माण झाला होता.त्यावेळी हा अनास्था प्रसंग गुदरला होता.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे होते.त्यावेळी सदर बैठक उथळली होती.मात्र त्या नंतर दोन्ही गटात हा समझोता झाला असल्याची माहिती पोलीस रामराव निरीक्षक ढिकले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सदर प्रसंगी सेनेचे नूतन सेनेचे शहर प्रमुख सनी वाघ यांच्या समर्थकांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे नव्याने दाखल झालेले पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांचे शाल,हार,श्रीफळ देऊन स्वागत केले आहे.त्यावेळी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,भरत मोरे,कैलास जाधव,अनिल आव्हाड,रवींद्र कथले आदी सैनिक दिसत आहे.

सदर प्रसंगी सदर प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रोहोदास ठोंबरे,भरत दाते,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे,शहराध्यक्ष सनी वाघ,माजी शहर प्रमुख भरत मोरे,कलविंदर दडीयाल,माजी उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव,विक्रांत झावरे,प्रफुल्ल शिंगाडे,इरफान शेख,बाळासाहेब साळुंके,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती अनिल आव्हाड,रवींद्र कथले,पोलीस कॉ.राम खारतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे प्रचलित प्रथे प्रमाणे तिथीनुसार सायंकाळी ०५ वाजता करणार असा दावा माजी शहराध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी केला होता.तर सेनेचे नूतन शहर प्रमुख सनी वाघ गट हा विघ्नेश्वर चौकातून ५.३० वाजता मिरवणूक काढणार होते.मात्र हे कार्यक्रम एकाच वेळी आमने-सामने होणार असल्याने कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याची भीती तयार झाली होती.त्यामुळे हि बैठक संपन्न झाली होती.मात्र एक ते दिड तास बैठक संपन्न होऊनही त्यावर दोन्ही गट आपल्या निर्णयावर ठाम असल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.

सदर प्रसंगी दोन्ही गट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे असल्याने दोन्हीनी एक विचाराने कार्यक्रम करावा असे आवाहन माजी उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव यांनी केले होते.मात्र झावरे गट मात्र आपल्या विचारावर ठाम राहिल्याने वाघ गट आमचा कार्यक्रम रद्द करा आम्ही महाराजांना अभिषेक करू असे सांगून सभागृहाबाहेर निघून गेले आहे.

सनी वाघ गटाला कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घेण्याचा पोलीस प्रशासनाचा आग्रह होता.झावरे गट तहसील मैदानावर कार्यक्रम घ्यायला तयार झाला नाही त्यामुळे दोन्ही गट आपल्या मुद्द्यावर ठाम राहिल्याचे पाहून शेवटी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून दोन्ही परवानग्या रद्द करण्याचा इशारा दिल्यावर बैठक रद्द करून टाकली होती.काही काळाने दोन्ही गट ठिकाणावर आले आहे.अखेर त्यात तडजोड म्हणून दोन्ही गटांनी रवींद्र कथले यांच्या माध्यमातून विक्रांत झावरे व कलविंदर दडियाल यांनी तडजोड करण्याची भूमिका घेतली होती.त्यात पहिला मिरवणुकीचा मान सेनेचे शहराध्यक्ष सनी वाघ यांच्या गटाला मिळाला असून त्यांनी सायंकाळी ६ ते ०८ वाजे दरम्यान आपली मिरवणूक आटोपून घेतल्यानंतर माजी नगराध्यक्ष राजेन्द्र झावरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रात्री ०८ ते १० या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.त्यामुळे दोन गटातील तिढा अखेर सुटला असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close