जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

शिर्डीत साईबाबा पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०२ वा श्रीं च्‍या पुण्‍यतिथी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्‍यात आली आहे.

पुण्यतिथी निमित्त आयोजित मिरवणूकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी पोथी,तदर्थ समितीचे सदस्‍य दिलीप स्‍वामी यांनी वीणा आणि उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व मंदिर प्रमुख रमेश चौधरी यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला.मिरवणूक व्‍दारकामाई मंदिरात आल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणास प्रारंभ झाला आहे.

उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रीं ची काकड आरती झाली.त्‍यानंतर पहाटे ०५.०० वाजता श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी प्रथम, तदर्थ समितीचे सदस्‍य दिलीप स्‍वामी यांनी व्दितिय, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी तृतिय,मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी चौथा व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांनी पाचव्‍या अध्‍यायाचे वाचन केले.सकाळी ०६.०० वाजता समाधी मंदिरात रिती रिवाज पुर्ण करण्‍यासाठी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी संगिता बगाटे यांच्‍या हस्‍ते श्रीं ची पाद्यपुजा करण्‍यात आली. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती झाली, दुपारी ०४.०० वाजता किर्तन झाले तर सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती झाली. रात्रौ १०.३० वाजता श्रीं ची शेजारती झाली. तर रात्रभर श्री साईसच्‍चरित अखंड पारायण व्‍दारकामाई मंदिरात सुरु होते.
उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रविवार दिनांक २५ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता श्रीं ची काकड आरती,पहाटे ०५.०० वाजता अखंड पारायण समाप्‍ती, श्रीं च्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक,पहाटे ०५.२० वाजता श्रीं चे मंगल स्‍नान,सकाळी ०६.०० वाजता श्रीं ची पाद्यपूजा, सकाळी ०८.३० ते ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम,सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी १०.३० वाजता श्रीं चे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. तर रात्रौ १०.३० वाजता श्रीं ची शेजारती होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close