जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

हमीभावाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उपाशी पोटी ठेवण्याचा प्रयत्न-पाटील

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सरकार शेतकऱ्यांना हमीभावाचे गाजर दाखवून त्यांना उपाशी पोटीच ठेवण्याचा प्रयत्न करीत असून हमीभाव हे स्वप्नच ठरत असल्याचा असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी नुकताच धुळे दौऱ्यावर असताना केला आहे.

सरकारे येतात घोषणांचा सुकाळ होतो मात्र कार्यवाहीबाबत मात्र दुष्काळ दिसून येतो त्याला हे भाजप सरकारही अपवाद नाही याबाबत त्यांनी कृतीत उतरावे उगीच बाष्कळ बडबड करू नये.हे सरकार सत्तेत आल्यावरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या नाही उलट त्या वाढत आहे हाच यांच्या शेती प्रश्नावरचा पराभव आहे-रघुनाथ दादा पाटील

केंद्रातल्या मोदी सरकारने पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे.केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या वाढलेल्या हमीभावाची घोषणा केली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रब्बीच्या २०२०-२१ या वर्षात प्रमुख पिकांचा हमीभाव वाढवण्याला मंजुरी देण्यात आली.यामुळे शेतकऱ्यांना लागत मूल्याच्या १०६ टक्क्यांपर्यंत लाभ मिळेल तसंच एमएसपीवर खरेदी पुढेही सुरू राहिल असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं होते.केंद्र सरकारने संसदेत कृषी विधेयकं संमत करून घेतल्यानंतर वाद निर्माण झाला होता.या कायद्यांमुळे सध्याचा हमीभाव कमी होईल अशी भीती बऱ्याच संघटनांना वाटत होती ती आज खरी ठरताना दिसत आहे.त्यामुळे देशात अनेक ठिकाणी आंदोलनंही झाली होती.वास्तवात आजही शेतीमालाची हमी भावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी होत आहे.हि वास्तुंस्थिती आहे.या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी या बाबत राज्यभर दौरा करून शेतकऱ्यांत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची बैठक धुळे येथे मका हमीभाव खरेदी आणि इतर शेतकरी प्रश्नांवर चर्चा करताना ते बोलत होते.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड आणि बळीराजा पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजी नाना नांदखिले,धुळे जिल्हा अध्यक्ष सरदार पाटील,कराड तालुका अध्यक्ष विनायक जाधव,कृषिभूषण ऍड प्रकाश पाटील त्याचबरोबर विनायक विंचुरकर शिंदखेडा तालुका,राहुल पाटील शिरपूर तालुका,आप्पा देवरे,भहु पाटील,संतोष खैरनार,योगेश शिंदे,सुनील पाटील,विकास पाटील,राजेंद्र पाटील,योगेश देसले,कल्पेश दोरिक,जितेंद्र पाटील,दीपक चौधरी,विलास ऐकनी आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,सरकारे येतात घोषणांचा सुकाळ होतो मात्र कार्यवाहीबाबत मात्र दुष्काळ दिसून येतो त्याला हे भाजप सरकारही अपवाद नाही याबाबत त्यांनी कृतीत उतरावे उगीच बाष्कळ बडबड करू नये.हे सरकार सत्तेत आल्यावरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या नाही उलट त्या वाढत आहे हाच यांच्या शेती प्रश्नावरचा पराभव आहे.असा आरोपही त्यांनी केला आहे.मका पीक हे शेतकऱ्यांना वरदान ठरायला हवे मात्र पीक निघाल्यावर त्याचा नेमका उलटा अनुभव येतो यावर अजून हे सरकार किती शेतकऱ्यांचा बळी घेणार आहे.असा कडवट सवालही त्यांनी शेवटी विचारला आहे.

सदर प्रसंगी कार्याध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिह नाना पाटील बिग्रेडचे अध्यक्ष नाना नांदखिले आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरकारच्या कारभारावर आसूड ओढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close