आरोग्य
कोपरगावात रुग्ण वाढ अत्यल्प
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ४८ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०५ रुग्ण बाधित आढळले आहे तर नगर तेथील व खाजगी तपासणीत एकही रुग्ण बाधित आढळला नाही तर आज आलेल्या एकूण अहवालात एकूण ०५ रुग्ण बाधित आढळले आहे.मात्र आज आलेल्या अहवालात शहरातील धारणगाव रोड परिसरातील दोन महिला तर चांदेकसारे येथील एक पुरुष तर संवत्सर (दशरथ) वाडी येथील एक महिला व गोधेगाव येथील एक महिला असे पाच रुग्ण बाधित आढळले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ५४ हजार २६८ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ८३७ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून ३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण होते आता मात्र ते कमी झाले आहे.हि समाधानाची बाब आहे.