जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या आश्रमात गुरु पौर्णिमा उत्सव उत्सवात संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात आयोजित गुरू पौर्णिमा उत्सवात देश विदेशातील दिड लाखाहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला असल्याचे दिसून आले आहे.या उत्सवाचे वेळी सामुहिक ध्यानधारण आणि संत पूजनकरण्यात आले असून गूरूपौर्मिणेच्या पहाटे ओम गुरूदेव माऊलींचे पूजन परमानंद महाराज व निजानंद महाराजांच्या हस्ते करण्यात आले आहे.यावेळी प्रसिध्द प्रवचनकार कणकेश्वरी देवी उपस्थित होत्या.या वेळी तीन दिवस उपस्थित भाविकांना महा प्रसादाचे वितरण करण्यात आले आहे.

कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात आयोजित गुरू पौर्णिमा उत्सवात गुरु माऊलींचा सत्कार करताना शिष्यगण आणि उपस्थित मान्यवर.

“ध्यान आणि मौनात मोठी शक्ती आहे,ध्यानधारणेमध्ये मन शांत करण्याची,एकाग्रता वाढवण्याची आणि मानसिक ताण कमी करण्याची अफाट शक्ती असते.नियमित ध्यानामुळे शरीराला विश्रांती मिळते व अंतर्गत ऊर्जा वाढते.त्यामुळेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात ध्यानधारणेसाठी देश विदेशातील भाविक येतात.गुरूपौर्णिमा उत्सवात देखील सत्संग आणि ध्यानाला महत्व दिले जाते”-परमानंद महाराज,अध्यक्ष,आत्मा मालिक ध्यानयोग मिशन.

     गुरु पौर्णिमा हा सण आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो.या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला,म्हणून याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.हा दिवस आपल्याला ज्ञान देणाऱ्या गुरूंच्या प्रती आदरांजली आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो.चार वेदांचे विभाजन,महाभारत आणि पुराणांची रचना करणाऱ्या व्यासमुनींना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस पाळला जातो.आपल्याला चांगले ज्ञान,शिक्षण आणि मार्ग दाखवणारे शिक्षक व आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते.कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील सद्गुरू जंगली महाराज आश्रमात हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.यावेळी गुरूपौर्णिमेनिमीत्त मध्य प्रदेशातील संत कणकेश्वरी माता यांच्या गुरूगीता कथेवर आधारीत प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते.त्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे.

कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात आयोजित गुरू पौर्णिमा उत्सवात देश विदेशातील उपस्थित भाविक दिसत आहेत.

  सदर प्रसंगी केंद्रीय मंत्री कैलास विजय वर्गीय,जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनी विखे,आ.आशुतोष काळे,विवेक कोल्हे,डाॅ.सुधिर तांबे,दुर्गा तांबे,आ.मंजुळा गावित,संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनी विद्यापिठाचे कुलगुरू अमित कोल्हे आदिंसह आत्मा मालिक शैक्षणीक संकुलातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी देखील या उत्सवात सहभाग घेतला.गुरूदक्षिणा म्हणून त्यांनी या उत्सवात भाजीपाला व धान्य भेट दिले.संत्सगासाठी तब्बल सत्तर हजार चौरस फुट आकाराचा मंडप उभारण्यात आला होता.

  आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष परमानंद महाराज उपाध्यक्ष निजानंद महाराज,विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,सचिव हनुमंत भोंगळे व विश्वस्त मंडळाने उत्सवाचे नियोजन केले होते.सातेशहून अधिक स्वयंसेवक भाविकांना विविध सेवा सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close