जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यास्थळावरील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बाल विकास केंद्रामध्ये दरवर्षीप्रमाणे याहीर्षीही श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आहे.

 

दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ यांचा सेवा मार्ग हा आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीसाठी काम करणारा एक महत्त्वाचा मार्ग मानला जात आहे.नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे याचे मुख्य केंद्र आहे.या सेवा मार्गाची मुहूर्तमेढ श्री सद्गुरू मोरेदादा यांनी रोवली.सध्या परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे हे या मार्गाचे प्रमुख म्हणून मार्गदर्शन करत आहेत.त्यांचा उद्देश हा सामान्यांच्या जीवनातील दुःख आणि अडचणी दूर करून त्यांना आध्यात्मिक प्रगतीकडे नेणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.

  दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ही परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी स्थापन केलेली एक प्रमुख आध्यात्मिक व सामाजिक चळवळ आहे.हा मार्ग अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज (दत्त अवतार) यांच्या शिकवणीवर आधारित असून,नि:स्वार्थ सेवा,नामस्मरण,पितृदोष निवारण,कृषि विकास आणि सामाजिक समरसतेवर भर देतो.दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ यांचा सेवा मार्ग हा आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीसाठी काम करणारा एक महत्त्वाचा मार्ग मानला जात आहे.नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे याचे मुख्य केंद्र आहे.या सेवा मार्गाची मुहूर्तमेढ श्री सद्गुरू मोरेदादा यांनी रोवली.सध्या परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे हे या मार्गाचे प्रमुख म्हणून मार्गदर्शन करत आहेत.त्यांचा उद्देश हा सामान्यांच्या जीवनातील दुःख आणि अडचणी दूर करून त्यांना आध्यात्मिक प्रगतीकडे नेणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.त्यांना मानणारा मोठा आध्यात्मिक समाज आहे.त्यामुळे स्वामी समर्थ पुण्यतिथी कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्यावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

   माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांचे सर्व धार्मिक कार्यात नेहमीच मोठे योगदान राहिले आहे.कारखाना व परिसरातील स्वामींच्या सेवेकऱ्यांना महाराजांची सेवा करता यावी यासाठी कारखाना कार्यस्थळावर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्राची स्थापना करून सुरु झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची परंपरा आजतागायत सुरु असून आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून याहीवर्षी श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येवून १५० महिला व ३५ पुरुष असे एकूण १८५ पारायणार्थी स्वामी चारित्र पारायण सप्ताहात पारायणाला बसले होते.केंद्रात होणाऱ्या प्रत्येक धार्मिक कार्याला त्यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या पुढाकारामुळेच हा सोहळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला आहे.पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वामी चारित्र पारायण सप्ताहात अध्यात्म आणि सेवेचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला आहे.या सात दिवसांच्या कालावधीत प्रहार सेवा देण्यात आली.यामध्ये दोन व्यक्ती माळ जप, दोन व्यक्ती श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन आणि दोन व्यक्तींचे अखंड वीणा वादन अशा स्वरूपात रात्रंदिवस नामस्मरण सुरू होते.स्वामी चरित्र्य पारायणाने संपूर्ण परिसर स्वामींच्या भक्तीने न्हाऊन निघाला होता.यामध्ये कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना व परीसरातील सेवेकऱ्यांसह सुरेगाव,कोळगाव थडी,माहेगाव देशमुख,शहाजापूर, कोळगाव माळ,विघनवाडी आणि वेळापूर येथील अनेक महिला भगिनींसह स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामींचरणी आपली सेवा अर्पण केली आहे.

  या सोहळ्याची सांगता नुकतीच महाआरतीने करण्यात येवून नंतर उपस्थित सर्व भाविकांना आणि सेवेकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या सांगता सोहळ्याप्रसंगी कारखान्याचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close