जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

ऊसाला योग्य दर देण्यास शेतकरी संघटना भाग पाडील-…या शेतकरी नेत्यांचा इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी कष्टाळू असून साखर कारखानदार मात्र त्यांच्या कष्टाच्या घामाला दाम देत नाही हि बाब अत्यंत वेदनायी असून त्यावर शेतकरी संघटना आवाज उठवून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे दाम देण्यासाठी कटिबद्ध आहे असे स्पष्ट प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी राहाता तालुक्यातील अस्तगाव (मोरवाडी) येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“भाजप आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे.मात्र शेतकऱ्यांच्या उसाला किमान हमी दर देत नाही.उसाच्या वजनात कारखानदार काटेमारी करत आहेत.स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणायचे आणि शेतकऱ्यांनाच लुटायचे असे धोरण सत्ताधारी वर्गाने घेतले आहे.भाजपने अनेक काँग्रेसी पुढाऱ्यांना आपल्यात पावन करून घेतले आहे.त्यामुळे भाजपही काँग्रेसी पुढाऱ्यांचे ऐकत असून त्यांनी भाजपमध्ये खोका पंरपरा निर्माण करून पदांची खैरात करून शेतकऱ्यांना उपाशी मारण्याचे काँग्रेसी धोरण पुढे चालू ठेवले आहे”-अड्.अजित काळे,उपाध्यक्ष,शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य.

राहाता तालुक्यातील अस्तगाव ग्रामपंचायत हद्दीतील मोरवाडी येथे नुकतीच शेतकरी संघटनेच्या शाखेचे उदघाटन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव रुपेद्र काले,संपर्क प्रमुख शिवाजी जवरे,जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे,तालुका अध्यक्ष युवराज जगताप,यूवा अघाडीचे शरद आसने,माजी जिल्हा अध्यक्ष अशोक पठारे,शेतकरी संघटनेचे जेष्ट मार्गदर्शक गोविंद वाघ,सुदाम औताडे,संजय जगताप,सागर वर्पे,सतिश मोरे,घनशाम,वाल्मिक मोरे,कैलास घोडेकर,अण्णासाहेब घोडेकर,बाळासाहेब मोरे,अमोल मोरे,पोपट माळवदे,हौशीराम दरेकर,आशोक घोडेकर,गणेश त्रिभुवन,सुनिल माळवदे,बाबासाहेब मोरे,सतिश मोरे,आदिनाथ मोरे,राजेंद्र शिंदे,अंबादास त्रिभुवन,संदीप मोरे,लखन घोडेकर आदी मान्यवरांसह बहुसंख्य शेतकरी व मोरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना तें म्हणाले की,”शेतकरी संघटना हि राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला त्यांच्या हक्काचे दर मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते स्व.शरद जोशी यांनी स्थापन केली आहे.त्यांनी देशभर याबाबत आवाज उठवला होता.व राज्यातील सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती.त्यांच्या मागण्यांची तत्कालीन भाजपने दखल घेऊन त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या होत्या.मात्र भाजप आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे.मात्र शेतकऱ्यांच्या उसाला किमान हमी दर देत नाही.उसाच्या वजनात कारखानदार काटेमारी करत आहेत.स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणायचे आणि शेतकऱ्यांनाच लुटायचे असे धोरण सत्ताधारी वर्गाने घेतले आहे.भाजपने अनेक काँग्रेसी पुढाऱ्यांना आपल्यात पावन करून घेतले आहे.त्यामुळे भाजपही काँग्रेसी पुढाऱ्यांचे ऐकत असून त्यांनी भाजपमध्ये खोका पंरपरा निर्माण करून पदांची खैरात करून शेतकऱ्यांना उपाशी मारण्याचे काँग्रेसी धोरण पुढे चालू ठेवले आहे.हे अत्यंत दुर्दैवी आहे.यात बदल केला नाही तर शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा त्यांनी दिला आहे.व गावोगावी शेतकरी वर्गास संघटित करील असा इशारा त्यांनी शेवटी दिला आहे.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेच्या राहाता तालुका अध्यक्षपदी योगेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांचा अड्.अजित काळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

त्यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केले तर उपस्थितांना शिवाजी जवरे,जिल्हा संपर्क प्रमुख रुपेंद्र काले,तालुकाध्यक्ष युवराज जगताप आदींनी मार्गदर्शन केले आहे.तर उपस्थितांचे आभार सतीश मोरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close