जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

शिर्डीत…या पक्षाच्या,’सोशल मीडिया सेलची’ बैठक संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतीय जनता पक्षाच्या,’सोशल मीडिया सेल’ची अ.’नगर जिल्ह्याची बैठक आज शिर्डी येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

“दरम्यान आगामी नगर परिषदा,नगर पंचायती,जिल्हा परिषदा,पंचायत समितीच्या निवडणुका गृहीत धरून राज्यातील व विशेषतः नगर जिल्हा भाजप सोशल मिडीया सेलला सक्रिय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे”-समीर आंबोरे,राज्य विभाग संयोजक,भाजप सोशल मीडिया सेल.

निवडणूक पुढे ढकललेल्या नगरपरिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष निवड होणार आहे.राज्यातील ९२ नगरपरिषदा,०४ नगर पंचायतीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीच्याबाबत मोठा निर्णय घेतला.नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.त्या शिवाय ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.त्यामुळे सत्त्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी,शिवसेना,काँग्रेस सतर्क झाले आहे.व राज्यात विविध शहरात बैठकाचे सत्र सुरु झाले आहे.शिर्डीसह नगर जिल्ह्यातही विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न होत असल्याने नुकतीच अशी बैठक भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी प्रदेश संयोजक प्रकाश गाडे,उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक समीर आंबोरे,जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे,गणेश जायभाय तसेच कार्यकारणी सदस्य आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.सदर प्रसंगी प्रदेश संयोजक प्रकाश गाडे व महाराष्ट्र विभाग संयोजक समीर आंबोरे यांचा जिल्हा भाजपच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी गोंदकर यांनी मार्गर्शन केले,तसेच प्रकाश गाडे व समीर आंबोरे यांनी कार्यकर्त्यांसमवेत चर्चा विनिमय करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी एक यशस्वी सरकार स्थापन झाले आहे याचा आनंद व्यक्त करत आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे लक्षात घेउन कार्य करण्याचे आवाहन त्यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

सदर बैठकीचे प्रास्ताविक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले तर बैठकीचा समारोप समीर आंबोरे यांनी केला.जिल्ह्यातून सर्व तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close