जाहिरात-9423439946
निधन वार्ता

संजीवनीचे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कोळपे यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष निवृत्ती चांगदेव कोळपे यांच्या मातोश्री म्हाळसाबाई चांगदेव कोळपे यांचे आज सायंकाळी ०६:०३ वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले मुली नातवंडे असा परिवार आहे.

स्व.म्हाळसाबाई कोळपे या अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाच्या म्हणून कोळपेवाडी व परिसरात परिचित होत्या.त्या कोळपेवाडी येथील जेष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब चांगदेव कोळपे,नगर माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब चांगदेव कोळपे यांच्या मातोश्री होत्या.

त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.त्यांचा अंत्यसंस्कार उद्या सकाळी ०९:०० वा कोळपेवाडी अमरधाम येथे होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close