जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तीन लाखांसाठी महिलेचा छळ,कोपरगावात चार जणांविरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील माहेर असलेली व संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील सासर असलेल्या महिलेने आपल्या माहेराहून गाडी खरेदीसाठी ३ लाख रुपये आणावे यासाठी तिचाच शारीरिक व मानसिक छळ करून क्रूर वागणूक दिल्या प्रकरणी फिर्यादी महिला आकांक्षा सुनील साळवे (वय-१९) हिने आरोपी नवरा सुनील रावसाहेब साळवे,सासरा रावसाहेब श्रीपद साळवे,सासू कमल रावसाहेब साळवे,भाया अनिल साळवे आदी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने चांदेकसारे व परिसरात खळबळ उडाली आहे.

“फिर्यादी महिलेने आपल्या माहेराहून गाडी खरेदी-विक्रीसाठी ३ लाख रुपये आणावे यासाठी तिचा नवरा सुनील साळवे,सासरा रावसाहेब साळवे,सासू कमळ साळवे,भाया अनिल साळवे आदींनी वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून तिला आडूनपाडून बोलून मारहाण करून क्रूर वागणूक दिली आहे.या प्रकरणी तिने नगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल मध्ये धाव घेऊनही उपयोग झाला नाही अखेर तिने चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि कोपरगाव तालुकुयातील चांदेकसारे येथील महेर असून तिचे लग्न ऑगष्ट २०२० मध्ये तिगाव येथील तरुण सुनील साळवे यांचेशी मोठ्या डामडौलात वाजतगाजत झाले होते.सुरुवातीचे नव्या नावलाईचे नऊ दिवस संपल्यावर सदर महिलेला सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सूरुवात केली होती.मात्र नवीन असल्याने सदर महिलेने हा त्रास सहन केला होता.मात्र यात जसे दिवस जात होते तसा त्या त्रासात वाढ होत गेली होती.अखेर तिने याबाबत आपल्या माहेरच्या मंडळींना सदर त्रास होत असल्याची माहिती दिली.व त्यास वाचा फुटली होती.

सदर प्रकरणी फिर्यादी ने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपल्या माहेराहून गाडी खरेदी-विक्रीसाठी ३ लाख रुपये आणावे यासाठी तिचा नवरा सुनील साळवे,सासरा रावसाहेब साळवे,सासू कमळ साळवे,भाया अनिल साळवे आदींनी वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून तिला आडूनपाडून बोलून मारहाण करून क्रूर वागणूक दिली आहे.या प्रकरणी तिने नगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल मध्ये धाव घेऊनही उपयोग झाला नाही.अखेर तिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी नवरा,सासरा,सासू,भाया या चार जणां विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने चांदेकसारे व परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जाधव,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार महेश कुसारे यांनी भेट दिली आहे.व परिस्थिती समजावून घेतली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.२८९/२०२२ भा.द.वि कलम ४९८ (अ) ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महेश कुसारे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close