जाहिरात-9423439946
कृषी विभाग

कोपरगाव तालुक्यात ठिबकचे ७० लाख रुपये अनुदान मंजूर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना मागील २०१९/२० या वर्षाचे ठिबक सिंचन अनुदान मिळावे यासाठी शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ७० लाख रुपये ठिबक सिंचन अनुदान मंजूर केले असून हि रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या भरवशावर २०१९/२० मध्ये असंख्य शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संच खरेदी केले होते. ठिबक सिंचन संचासाठी प्रतिकूल परिस्थितीत मोठी गुंतवणूक करून शेतकरी अडचणीत आल्यामुळे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. ठिबकचे अनुदान तातडीने मिळावे याबाबत शेतकऱ्यांनी आ. काळे यांना पाठपुरावा करण्याची मागणी केली होती.


प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की,”पाण्याची बचत होवून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात करावा यासाठी शासनाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या भरवशावर २०१९/२० मध्ये असंख्य शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संच खरेदी केले होते. ठिबक सिंचन संचासाठी प्रतिकूल परिस्थितीत मोठी गुंतवणूक करून शेतकरी अडचणीत आल्यामुळे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. ठिबकचे अनुदान तातडीने मिळावे याबाबत शेतकऱ्यांनी आ. काळे यांना पाठपुरावा करण्याची मागणी केली होती.त्याबाबत राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे,पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हा नियोजन बैठकीत लक्ष वेधून त्याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच मागील महिन्यात कृषी आयुक्त यांच्याशी देखील याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. त्या पाठपुराव्यातून जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ४३.९० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात येवून हि अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यापूर्वीच जमा झालेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे देखील ठिबक सिंचन अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरूच होता. त्या पाठपुराव्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देतांना सुक्ष्म सिंचन योजना अंतर्गत २०१९-२०च्या ठिबक सिंचन अनुदानापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात नव्याने ७० लाख रुपये अनुदान जमा केले आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्याला आजपर्यंत एक कोटी चोवीस लाख रुपये एकाच महिन्यात ठिबक सिंचन अनुदानापोटी मिळाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर ठिबक सिंचन योजनेचे अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरूच असून त्याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले आहे. सध्या देशभर कोरोना विषाणूचे संकट आहे. या संकटात तीन महिने टाळेबंदी असल्यामुळे आर्थिक चाके रुतली असतांना महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांना एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ठीबक सिंचनचे अनुदान देवून खरीप हंगामात योग्य वेळी सहकार्य करून मोलाची मदत केल्याबद्दल आ. काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close