संपादक-नानासाहेब जवरे
लोहगाव-(वार्ताहर )
राहता तालुक्यातील लोहगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
कार्यक्रमास उपसरपंच सुरेश चेचरे,ज्ञानदेव चेचरे,शांताराम चेचरे,किशोर चेचरे,भगवान ठोंबरे,देविदास पवार, ज्ञानेश्वर पगारे,सोपान पगार,सुरेश शेलार,महेश सुरडकर,अशोक खरात,संजय सुरडकर, निलेश चेचरे,अजित चेचरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार भगवान ठोंबरे यांनी मानले.
यावेळी रामायणाचार्य संदीप महाराज चेचरे हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,” अण्णा भाऊ साठे भारताला लाभलेले मोठे रत्न आहे.त्यांनी आपल्या जीवन काळामध्ये अनेक कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये “फकीरा” कादंबरीचा सामाविष्ट आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये समाज कार्य करत असताना,” ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी है”हि घोषणा दिली होती.अण्णाभाऊंनी अनेक मोर्चामध्ये सहभाग घेतला समाजातील प्रत्येक घटकात न्याय मिळावा हि त्यांची इच्छा होती ह्या असामान्य व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावी असे विचार संदीप महाराज चेचरे यांनी व्यक्त केले.