आरोग्य
..आता कोपरगावसह मंजूर येथेही कोरोनाचे रुग्ण !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात गत दोन दिवसात ३२ रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा कोपरगावात १० रुग्ण तर कोळगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत एक वीस वर्षीय पुरुष व मंजूर येथे एक आज एक ६० वर्षीय महिला असे एकूण बारा रुग्ण बाधित आढळले असून आता बाधित रुग्णांची संख्या ११३ झाली असून सक्रिय रुग्ण ७३ असल्याची माहिती तालुका अवैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरिकांत या साथीची साधार भीती वाढली आहे.
दरम्यान आज ३० श्राव तपासणीसाठी आज पाठवले आहे.या आधी ५२ श्राव तपासणी साठी पाठवले आहे आता एकूण तपासणीसाठी पाठवलेले एकूण श्राव संख्या ८२ आहे त्याकडे नागिकांचे लक्ष लागून आहे.त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ११३ झाली असून त्यात सक्रिय रुग्ण ७३ असल्याची माहिती आरोग्य विभागाने आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरिकांत काळजीचा सूर उमटला आहे.
कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०४ हजार ४७८ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा १७ लाख ०१ हजार ५३२ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ३६ हजार ५८७ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ३ लाख २२ हजार ११८ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १४ हजार ९९४ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ०४ हजार ७४० वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ६१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर येथील सारीचा रुग्ण धरून दोन बळी गेले आहे.तर आत्ता पर्यंत तालुक्यात शहरासह ११२ रुग्ण बाधित झाले आहेत.अलीकडील काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.विशेषतः आता हि साथ छोटी खेडीही आपल्या मगर मिठीत घेत असल्याचे मंजूर,पढेगाव,करंजी,सुरेगाव आदी गावावरून स्पष्ट होत आहे.
कोपरगाव तालुक्यात तीन दिवसांपूर्वी पुन्हा तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते.काल ५२ संशयित रुग्णांचे रॅपिड टेस्ट अहवाल नगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते त्यातील ४१ निरंक आले असून ११ बाधित आले आहे त्यात एक इंदिरानगर येथील ५० वर्षीय महिला, तर गांधीनगर येथील दोन रुग्ण बाधित निघाले आहे त्यात एक ४५ वर्षीय तर एक २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.स्वामीसमर्थनगर येथील २ रुग्ण बाधित निघाले असून त्यात ६४ वर्षीय पुरुष तर एक ६९ वर्षीय महिलेचा समावेश आहे.गुरुद्वारा रोड येथील दोन रुग्ण कोरोना बाधित आढळले असून त्यात एक २८ तर एक ४२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.या खेरीज सुभाषनगर येथील एक ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.बैलबाजार रोड येथील एक ५२ वर्षीय पुरुषही कोरोना साथीला बळी पडला आहे.तर पढेगाव येथील ०८ वर्षीय बालक तर मंजूर येथील एक ६० वर्षीय महिलेचा व कोळगाव थडी येथील खाजगी प्रयोग शाळेत तपासणी करून बाधित आढळलेला वीस वर्षीय तरुण यांचा त्यात समावेश आहे.दरम्यान आज ३० श्राव तपासणीसाठी आज पाठवले आहे.या आधी ५२ श्राव तपासणी साठी पाठवले आहे आता एकूण तपासणीसाठी पाठवलेले एकूण श्राव संख्या ८२ आहे त्याकडे नागिकांचे लक्ष लागून आहे.त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ११३ झाली असून त्यात सक्रिय रुग्ण ७३ असल्याची माहिती आरोग्य विभागाने आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरिकांत काळजीचा सूर उमटला आहे.