जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महिला बालविकास विभाग

…या महाविद्यालयात महिला जन जागृती कार्यशाळा संपन्न 

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   नगर येथील महिला व बालविकास विभाग,जिल्हा परिषद व कोपरगाव येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व महिलांसाठी लिंगभाव व कुटुंब नियोजन जनजागृती प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे हे होते.

“विकासातील स्त्री दृष्टिकोण समाजातील विविध संरचना मान्य करतो;मात्र स्त्रियांचे दुय्यमत्व,शोषण,लिंगभाव संबंध,पुरुष पूरक तंत्रज्ञान,संसाधनांचे वाटप यांबाबत चिकित्सक प्रश्न उभे करीत नाही.आज शासनाने याबाबत बरेच बदल घडवले आहे”- श्रीमती देवगुणे मॅडम,कोपरगाव.

    भारतात पितृक वर्चस्व असून प्राचीन काळापासून महिलांमध्ये भेदभाव केला जात होता.अनेक बंधनकारक असूनही हे आजही चालू आहे.महिलांचे पुनरुत्पादक हक्क,प्रतिबंध आणि आरोग्याशी संबंधित महिलांवर अत्याचार आणि शोषण करण्यासाठी आजही वापर होत आहे.समान हक्काचे कायदेत कायदेत वास्तविकता आहे.लिंगभाव आणि विकास यासंदर्भात मांडणी करताना विकासातील स्त्रिया आणि स्त्रिया व विकास हे दृष्टिकोण बघणे आवश्यक आहे.विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांना एकतर अदृश्य ठेवले गेले किंवा वगळण्यात आले.स्त्रिया या कुटुंबामध्ये आणि समूहांमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावतात,तरीही त्यांच्या श्रमाची मोजदात होत नव्हती.त्यामुळे स्त्रियांचा वैयक्तिक विकास व्हावा यासाठी स्त्रियांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यावर हा दृष्टिकोण भर देतआहे.१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला ईस्टर बोसरप यांच्या वुमेन्स रोल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या पुस्तकात सदरच्या संकल्पनेला धरून मांडणी करण्यात आली आहे.ईस्टर यांनी सर्वांत प्रथम स्त्रियांना एक स्वतंत्र विकासाच्या प्रक्रियेतील एक अभिव्यक्ती म्हणून पाहिले.अभ्यासक या दृष्टिकोणावर टीका करताना नमूद करतात की,विकासातील स्त्री दृष्टिकोण समाजातील विविध संरचना मान्य करतो;मात्र स्त्रियांचे दुय्यमत्व,शोषण,लिंगभाव संबंध,पुरुष पूरक तंत्रज्ञान,संसाधनांचे वाटप यांबाबत चिकित्सक प्रश्न उभे करीत नाही.आज शासनाने याबाबत बरेच बदल घडवले आहे.जन जागृती सुर केली आहे.याबाबत कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालयात नुकतीच जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली आहे.

   याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव पंचायत समितीच्या श्रीमती देवगुणे,नाथबाबा महिला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर मुळेकर,विख्यात कायदेतज्ञ ऍड.गौरी लोखंडे, फिरोदिया हायस्कूल,वांबोरीच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती लोखंडे,सेवानिवृत्त आरोग्यसेविका श्रीमती विजया कोनाळे,महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब सोनवणे,
प्रा.मयुरी भोसले,प्रा.श्रद्धा खालकर,प्रा.ज्योती लोंगानी आदी मान्यवर उपस्थित होत्या.
              
  सदर प्रसंगी श्रीमती देवगुणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यावेळी त्या म्हणाल्या की,”१९७० दशकाच्या मध्यास हा दृष्टिकोण विकसित झाला.स्त्रिया या पूर्वीपासून आर्थिक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत्या,शेती क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात.असे असले तरी,स्त्रियांच्या श्रमाचे मूल्यांकन केले जात नाही.त्यांना केवळ विकासाचे लाभार्थ म्हणूनच पाहिले जात होते आता यात बदल होत आहे.त्यामुळे विकासातील स्त्रिया हा हा दृष्टीकोन महत्त्वाचा असून तो स्त्रियांचे योगदान अधोरेखित करतो.तो स्त्रिया आणि विकास यांमधील संबंधावर प्रकाश टाकत असल्याचे सांगून; मात्र तो पितृसत्ता,उत्पादनाची विभिन्न साधने आणि स्त्रियांचे शोषण व दुय्यमत्व यांच्यातील संबंधाचे विश्लेषण करीत नाही.असे ही त्यांनी शेवटी सांगितले आहे.

   यावेळी श्रीमती विजया कोनाळे,ऍड.गौरी लोखंडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जावेद शाह यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.मिलिंद कांबळे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close