जाहिरात-9423439946
संपादकीय

अफगाणिस्तानात तालिबानचा उदय,भारतासाठी धोक्याची घंटा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गेले कित्येक दिवसाचे अफगाण मधील चालू असलेले नाट्य संपले आणि आज काबुलचा ताबा अखेर तालिबान्यांनी घेतला. हे लिहत असे पर्यंत सत्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली असेल.हत्ती नाही,घोडा नाही,वाघाचे तर नाव नको ! गरीब बिचारा बोकड मेला,दुबळा तू कधी राहू नको ! असे म्हंटले जाते ते सत्यात उतरताना अफगाण च्या घडामोडीवरून दिसत आहे .अफगाणिस्तान अमेरिकेच्या भरवशावर होते पण शेवटी “जो दुसऱ्यावर विसम्बला त्याचा कार्यभाग बुडाला !” हे पुन्हा सिद्ध झाले. ट्रम्प गेले बायडन आले त्यांनी सैन्य काढून घेतले आणि लगेच सगळे आटोपले.अमेरिकन सैन्य हे अफगाण सेनेला प्रशिक्षण देण्यासाठी थांबले होते असे म्हणतात . पण त्या प्रशिक्षणाचा काय फज्जा उडाला तो सारे जग बघत आहे.

भारतातील विचारवंत आणि ट्विटर टूल किट गॅंग ला आज काबूल हुन येत असलेला महिलांचा आक्रोश ऐकू येणार नाही. तेथील महिलां च्या बरोबर तालिबानी सैन्य करत असलेले अत्याचार,त्यांना सेक्स गुलाम म्हणून जे वागवले जात आहे,त्या वर शबाना,जया,स्वरा याना काही घेणे देणे नाही कारण हिंदूंना दूषणे द्यायचे आणि मुस्लिम कट्टरता वाद मात्र दुर्लक्षित करायचा हीच येथील पुरोगामी वैचारिक मान्यता आहे !पण भारतातील सुजाण नागरिकांनी या अफगाण घडामोडीकडे नीट लक्ष देण्याची आणि शिकण्याची गरज आहे.

मुळात अमेरिकेला फार प्रेम होते म्हणून ते तालिबान ला विरोध करत नव्हते आणि रशिया पण फार प्रेमाने तालिबानला मदत करत नव्हते तर हा दोन महाशक्तींच्या सराव युद्धाचा प्रकार होता त्यात बिचारे अफगाण हे होरपळून गेले.मानवी मूल्ये, जागतिक शांतता,महिलांचा सन्मान आणि वैज्ञानिक दृष्टी ही सगळी या देशांची तोंडी लावण्याचे पदार्थ आहेत.या सर्व शक्तिशाली देशांना करायचा आहे शस्त्रांचा व्यापार ! “बळी तो कान पिळी ” हा सर्वत्र न्याय आहे ! यात भरडले जात आहेत दुबळे राष्ट्र आणि त्यांची भाबडी जनता !

या सर्व खेळासाठी सीमेटिक विचारसरणी या मंडळींना पूरक आहे आणि त्या मुळे अमेरिका असो,चीन असो किंवा रशिया याना मुस्लिम धर्मवेडे पण हे त्यांच्या अंतर्गत राजकारणासाठी फायद्याचेच आहे .त्यामुळे वेळ प्रसंगी कधी पाकिस्तान , कधी अफगाणिस्तान तर कधी इराण , इराक कधी पलेस्टिन याना आळी पाळीने प्रोत्साहन देत दहशतवाद खरे तर यांनी पोसला आहे.

इस्राएल सारखा देश स्वतःच्या शक्तीवर उभा राहिला सुरुवातीला जरूर अमेरिकेने त्यांना राजकीय पाठिंबा दिला पण नंतर इस्राएल ने स्वतः ला संरक्षण सिद्ध केले.तालिबानी ही एक प्रवृत्ती आहे. माणसांना मध्ययुगीन वातावरणात नेणारी ही अपप्रवृत्ती आहे. धार्मिक आणि श्रद्धेच्या बाबतीत असहिष्णू कसे असावे याचा नमुना म्हणजे तालिबानी वृत्ती ! ९२ ते ९६ काळात यांनी बौद्ध पुतळ्यांचे काय केले, हा इतिहास जुना नाही ! तालिबान ला प्रोत्साहन पाकिस्तानचे आणि पाकिस्तानला तालिबानचे ! दक्षिण आशियात भारताची वाट निर्वेध नको आणि भारतावर अंकुश ठेवण्यासाठी पाकिस्तान उपयोगी पडत नाही म्हणून तर तालिबान ला रस्ता मोकळा केला नाही ना ? अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे . चीन , पाकिस्तान आणि तालिबान एकत्र येऊन भारतापुढे
नवे दहशतवादी आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे .

दुर्दैवाने भारतातली तमाम विरोधी पक्ष आणि डावे, लुटीयन्स याना ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती समजली तरी डोळे मिटून,तोंड बंद करून बसायचे आहे.कारण ही आमची तथाकथित पुरोगामी धर्मनिरपेक्ष परंपरा आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर परराष्ट्र धोरण ठरवताना सुद्धा भारतातल्या मुसलमानांना दुखवायचे नाही म्हणून कट्टरवादी विचारापुढे आम्ही गुडघे टेकवत राहिलो आणि फाळणी स्वीकारण्याच्या मानसिकतेतून च देश आणि देशा बाहेरील मुस्लिम समस्येकडे बघत राहिलो.पण आता कधी नव्हे ते योग्य दृष्टिकोन असणारे केंद्र सरकार आणि केंद्रीय नेतृत्व आम्हाला मिळाले आहे . जो पर्यंत जग मुस्लिम प्रश्न हा मुळातून समजून घेत नाही तो पर्यंत प्रत्येक देशात कमी अधिक फरकाने तालिबानी वृत्ती डोके वर काढत राहणारच आहेत.फ्रांस हे त्याचे अलीकडील जिवंत उदाहरण आहे.

भारतातील विचारवंत आणि ट्विटर टूल किट गॅंग ला आज काबूल हुन येत असलेला महिलांचा आक्रोश ऐकू येणार नाही. तेथील महिलां च्या बरोबर तालिबानी सैन्य करत असलेले अत्याचार,त्यांना सेक्स गुलाम म्हणून जे वागवले जात आहे,त्या वर शबाना,जया,स्वरा याना काही घेणे देणे नाही कारण हिंदूंना दूषणे द्यायचे आणि मुस्लिम कट्टरता वाद मात्र दुर्लक्षित करायचा हीच येथील पुरोगामी वैचारिक मान्यता आहे !पण भारतातील सुजाण नागरिकांनी या अफगाण घडामोडीकडे नीट लक्ष देण्याची आणि शिकण्याची गरज आहे.ज्या देशात स्थिर सरकार आणि खंबीर नेतृत्व नाही तेथे मुस्लिम कट्टरता वाद लवकर पसरतो आणि हळू हळू आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा भाग बनतो हा इतिहास आहे .

सुदैवाने खंबीर नेतृत्व आणि स्थिर केंद्र शासन या बाबतीत आम्ही सध्या नशीबवान आहोत ! गरज आहे ती आशा नेतृत्वाचे आणि सरकारचे हात बळकट करण्याची ! विरोधी पक्षात खरेच जर योग्य विचार करणारी काही मंडळी असतील तर निदान परराष्ट्र आणि संरक्षण या दोन बाबतीत तरी मोदी विरोधी अजेंडा बाजूला ठेवत देशहिताचा विचार त्यांनी केला पाहिजे !

आमच्या देशाच्या वैश्विक जबाबदारीची कधी नव्हे इतकी आवश्यकता निर्माण होत आहे.अशा वेळेस सशक्त,आत्मनिर्भर, एकसंघ राष्ट्र म्हणून उभे राहण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आम्ही कटिबद्ध होणे
हेच याचे उत्तर आहे.

अफगाणिस्थान मध्ये वाजलेली धोक्याच्या घंटेचा आवाज भले भारतातील काही कर्ण बधिर लोकांना ऐकू जाणार नाही,काही जण ऐकू येऊ लागले तर कान बंद करतील पण ज्यांना तो आवाज स्पष्ट ऐकू येतो आहे, किमान त्यांनी तरी सावध झालेच पाहिजे ! ही काळाची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close