जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात घरात घुसून महिलांना मारहाण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील उपनगर असलेल्या खडकी येथे त्याच परिसरातील आरोपी विशाल मच्छीन्द्र साळवे याने फिर्यादी व त्या महिलेची जावं घरात असताना मागील भांडणाचे कारण उकरून काढून फिर्यादी महिलेच्या भावास विचारले असता तिने तो घरात नसल्याचे सांगितले असता आरोपीने फिर्यादी महिलेच्या भावास मारहाण करून त्या सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारती रवींद्र आठरे (वय-२६) या महिलेने दाखल केला आहे.

जुन्या एका भांडणाचा संदर्भ देऊन आरोपी विशाल साळवे याने दि.१७ ऑगष्ट रोजी सकाळी ११.३० वाजता फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन फिर्यादी महिलेच्या भावाची चौकशी केली असता त्या महिलेने ‘तो’ बाहेर गेला आहे”.असे सांगितले असता त्याने त्यास अर्वाच्च शिवीगाळ सुरु केली व ‘तो, खूप माजला आहे’,असे म्हणून तिला व तिच्या घरातील अन्य दुसऱ्या महिलेला मारहाण केली आहे.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत वायव्येस साधारण तीन की.मी.अंतरावर खडकी हे उपनगर आहे.या ठिकाणी फिर्यादी महिला भारती आठरे व आरोपी विशाल साळवे हे जवळ-जवळ राहतात.त्याचे काही कारणावरून भांडण सुरु आहे.अशाच एका भांडणाचा संदर्भ देऊन आरोपी विशाल साळवे याने दि.१७ ऑगष्ट रोजी सकाळी ११.३० वाजता फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन फिर्यादी महिलेच्या भावाची चौकशी केली असता त्या महिलेने ‘तो’ बाहेर गेला आहे”.असे सांगितले असता त्याने त्यास अर्वाच्च शिवीगाळ सुरु केली व ‘तो, खूप माजला आहे’,असे म्हणाला त्यास फिर्यादी महिलेने समजावून सांगितले असता त्यास त्याचा राग आला.व त्याने फिर्यादी महिला ब भारती आठरे हिस चापटीने मारहाण करून फिर्यादिस व साक्षिदार यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा क्रं.२५७/२०२१ भा.द.वि.कलम ४५२,३२३,५०४,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.डी.तिकोणे हे करीत हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close