संपादकीय
विधानपरिषद निवडणूक,निष्ठावान की आगंतुकाना संधी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीत इच्छुकांची गर्दी वाढल्याने महाराष्ट्रातील राजकारणात रस्सीखेच होणे स्वाभाविक मानले जात आहे.विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे.या नऊ जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत.त्यात नगर जिल्ह्यातील सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची वर्णी लागणार का ? ती लागली तर कोपरगावला आणखी एक आमदार मिळेल त्यातून फायदा होणार की नुकसान याचा अनुभव जनतेला माहिती आहे.पण यात भाजप निष्ठावानाना यात संधी दिली जाणार ? या कडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीत भाजप संघटनेत निष्ठेने काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे भाजपने घेतला होता.त्यात रवी अनासपुरे,केशव उपाध्ये,राजेश पांडे,दयाशंकर तिवारी,राम सातपुते,संजय केणेकर,दादाराव केचे,संजय भेंडे आदींना भाजप न्याय देणार की,रणजितसिंह निंबाळकर,संजय काका पाटील,विवेक कोल्हे,जगदीश मुळीक,प्रमोद जठार आदीं आगंतुक पाहुण्यांना न्याय देणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी म्हटले होते की,”राजकारण म्हणजे केवळ सत्तेच्या क्षेत्रात काही कारभार करणे व निवडणूक लढविणे नसून समाज परिवर्तनाचे ते एक साधन आहे.सामाजिक क्रांती हेच आपल्या सार्वजनिक जीवनाचे एक उद्दिष्ट बनले पाहिजे.देशाचा विकास व समृद्धी घडविण्याचे ते एक साधन बनले पाहिजे पण आज दुर्दैवाने जे दिसत आहे त्याची कल्पना कोणी केली नसेल.इतके राजकारणात परिवर्तन झाले आहे.त्यामुळे आज कार्यकर्ते कोण आणि नेते कोण ओळखणे अवघड बनले आहे.याची आठवण येण्याचे कारण इतकेच की,”आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये समावेश असलेल्या विवेक कोल्हे यांनी सोमवारी रात्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतकी आहे.आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.यावर्षी यंदा भाजपकडून विधान परिषदेसाठी विवेक कोल्हे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून त्यासाठी माजी आ.स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे युवराज विवेक कोल्हे आदी मुंबईत तळ ठोकून असल्याच्या बातम्या आहेत.त्याला कारणही तसेच मानले जात आहे.त्यांनी गतवर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमदेवार आ.आशुतोष काळे यांच्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देऊन माघार घेतली असल्याचे निवडणुकीतून माघार घेतली असल्याचा दावा केला जात आहे.शिर्डी दौऱ्यात नुकतेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विवेक कोल्हे यांच्या विधान परिषदेसंदर्भात त्यांनी मदत केल्याची आठवण करून देऊन त्याचे स्मरण करून दिले होते.त्यामुळे त्यांचे नाव स्पर्धेत असल्याचे किमान जाणवले तरी आहे.या पार्श्वभूमीवर त्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक ही महत्वाची मानली जात आहे.

माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी राज्यभर भाजपचे कार्यकर्ते घडवले आज त्या कोपरगाव शहर आणि तालुक्यात या योग्यतेचे एकही कार्यकर्ता पक्षाला दिसू नये यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही.त्यात माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांच्या खांद्याला खांदा देऊन लढलेले कार्यकर्ते ॲड.मच्छिंद्र खिलारी,ॲड.जयंत जोशी,ॲड.रवींद्र बोरावके,सतीश कृष्णांनी,माजी शहराध्यक्ष प्रभाकर वाणी,प्रति अटलबिहारी समजले जाणारे टेकचंद खुबानी,माजी तालुकाध्यक्ष वाल्मीक भोकरे,छन्नोदास वैष्णव,नामदेवराव जाधव आदीं पहिल्या फळीतील काही नावे आहेतच पण दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्ते आजही पक्षाच्या सतरंज्या आणि जोडे उचलण्याचे काम मनोभावे करत आहेत.त्यांना हा पक्ष कधी न्याय देणार ? हा प्रश्न मन सुन्न करणारा आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातून नुकतीच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांची राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिश्तकोत्तर जयंती निमित्त आयोजित केलेली जल यात्रा कोपरगाव येथून पुढे गेली आहे.त्यावेळी संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर त्याचे जोरदार स्वागत झाले आहे.एरव्ही ते झाले असते का ? हा खरा प्रश्न आहे.आणि त्याचे उत्तर नकारात्मकच येण्याची दाट शक्यता आहे.मात्र विधानपरिषद निवडणूक तोंडावर आल्याने या जल यात्रेत अनुपस्थित राहणे किंवा स्वागत न करणे हे स्वतःचे नाक कापून अपशकून करण्यासारखे ठरले असते तेवढे चातुर्य या मंडळींनी नक्कीच दाखवले आहे आणि त्यात ही मंडळी वाकबगार मानली जाते.मात्र त्यावेळी स्वतः अनुपस्थित राहून योग्य तो संदेश वरिष्ठ नेत्यांना विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे यांना दिला असल्याचे मानले जात आहे.परिणामी पुढील लढाईला आश्वासक जमापुंजी त्यांनी जमा केली असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचे भात्यातील अस्त्रेशस्त्रे बोथट ठरविण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक आखलेली ही रणनीती मानली जात आहे.त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी दिल्लीपती या उपऱ्यांना संधी देणार की ज्यांनी पक्षासाठी आयुष्य ओवाळून टाकले त्या निष्ठावानाना संधी देणार याकडे राज्यातील निष्ठावानाचे लक्ष लागून राहिले आहे.

आज मंत्री विखे आणि माजी आ.कोल्हे कुटुंबांचे विल्याभोपळ्याचे वैर आहे हे जिल्ह्यासह राज्याला विदित आहे.त्यामुळे त्यांना हा अडथळा ओलांडून पुढे जावे लागणार आहे.त्यासाठी त्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सहारा घेतला असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पर्यंत पोहचत आहे हे खरे आहे.वर्तमानात मंत्री विखे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात फार सख्य राहिलेले नाही.त्यासाठी मंत्री विखे यांनी पुढची दिल्ली पायरी गाठलेली असल्याचं मानले जात आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि गृहमंत्री अमित शहा यांचेशी त्यांनी सूत साधलेले आहे.त्यामुळे या लढाईत आता कोण बाजी मारणार हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान गत महापालिका निवडणुकीत भाजपाने ज्या उपऱ्यांना पायघड्या घातल्या त्याचे मोठे पडसाद उमटले होते.आणि निष्ठावानाच्या पार नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना चुकीचे कोण ठरवणार ? अशी विचित्र स्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे अनेक ठिकाणी बंड झाल्याचे पाहायला मिळाले आहे.त्यामुळे यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यावर तो मोठा दबाव मानला जात आहे.कोपरगाव शहरातील भाजप निष्ठावानाची आजपर्यंत कोणी गळचेपी केली हे सर्व जगाने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेच.त्यात माजी प्रदेशाध्यक्ष स्व.खा.सूर्यभान पाटील वहाडणे सुटलेले नाही.त्यांचा काळ हा आयुष्य ओवाळून टाकणाऱ्या सिद्धीचा होता आजचा काळ हा केवळ प्रसिद्धीचा आहे.आज त्यांची पुढील पिढी राजकारणात सक्रिय आहे.हे या पार्श्वभूमीवर आश्चर्य मानले पाहिजे.त्यात विजय वहाडणे यांनी सन-2016 च्या नगरपरीषद निवडणुकीत याच मंडळींना अस्मान दाखवून आणि सर्वाधिक मोठी उडी मारून भाजपचा झेंडा रोवला होता.मात्र त्यानंतर त्यांना पक्षाची जुळवून घेता आले नाही.असे म्हणण्यापेक्षा ईशान्यगडावरील काहीनी वारंवार पक्ष श्रेष्ठी आणि त्यांच्यात दिलजमाई होणार नाही याची काटेकोर काळजी घेतली होती.आणि विशेष म्हणजे ती बाब वरिष्ठ नेत्यांनी खरी मानली होती हे आजपर्यंत आक्रित मानले जात आहे.तीच बाब आजही बी.एस.एन.एल.चे संचालक रवींद्र बोरावके यांचे बाबतीत घडत असताना दिसून येत आहे.मात्र या
उपऱ्यांचे किती ऐकायचे आणि किती कानामागे टाकायचे याचे गणित निदान मूळ भाजप नेत्याना आणि शिवसेनेच्या (उबाठा)नेत्यांना अद्याप साधले असल्याचे दुर्दैवाने दिसून आले नाही.परिणामी ज्याच्या विरुद्ध मूळ भाजप आणि शिवसेनेने आपल्या प्रपंचाची धूळधाण करून जी लढाई केली त्यांच्याच बरोबर पक्ष श्रेष्ठींनी त्यांना एकत्र खीर खायला सांगून पक्षांच्या कार्यकर्त्यांचा घात केला असल्याचे आजवर दिसून आलेले आहे.परिणामी सांप्रत काळी हे पक्ष शुक्ल पक्षातील चंद्रकोरी प्रमाणे घटत जाताना दिसून आले आहे.परिणामी येथील शेतकरी आणि सामान्य माणूस अजून पिचला गेला असल्याचे दिसून आले आहे.त्यातून अजूनही हे कार्यकर्ते सावरलेले नाही.कोपरगावात भाजपसाठी आपल्या आयुष्याची धूळधाण करून घेणारे कार्यकर्ते कमी नाही पण आज त्यांना कोणी वाली उरला नाही.राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वस्थळी चुकीचे आणि निष्ठावांचे कदर करणारे नेते नसले की त्या पक्षाची कशी वाताहत होते याचे उत्तम उदाहरण कोपरगाव,शिर्डी,संगमनेर आदी साखर सम्राटांचे मतदार संघ असल्याचे दिसून येईल.आजही याच निष्ठावानाचे नाव चर्चेत का येत नाही हेच विशेष मानले जात आहे.जेथून माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी राज्यभर कार्यकर्ते घडवले आज त्या कोपरगाव शहर आणि तालुक्यात या योग्यतेचे एकही कार्यकर्ता पक्षाला दिसू नये यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही.त्यात माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांच्या खांद्याला खांदा देऊन लढलेले कार्यकर्ते
ॲड.मच्छिंद्र खिलारी,ॲड.जयंत जोशी,ॲड.रवींद्र बोरावके,सतीश कृष्णांनी,माजी शहराध्यक्ष प्रभाकर वाणी,प्रति अटलबिहारी समजले जाणारे टेकचंद खुबानी,माजी तालुकाध्यक्ष वाल्मीक भोकरे,छन्नोदास वैष्णव,नामदेवराव जाधव आदीं पहिल्या फळीतील काही नावे आहेतच पण दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्ते आजही पक्षाच्या सतरंज्या आणि जोडे उचलण्याचे काम मनोभावे करत आहेत.त्यांना हा पक्ष कधी न्याय देणार ? हा प्रश्न मन सुन्न करणारा आहे.आज चर्चेत असलेले नावे याच भाजपच्या मुळावर घाव घालण्यासाठी गेली तीन पिढ्या कार्यरत होते.याचा पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना विसर कसा पडतो हा खरा प्रश्न आहे.जी नावे आज मिडिया प्रायोजित चर्चेत आणली जातात.त्यांचा शेतकरी शोषित ‘अर्थ ‘ हा एकच घटक बाजूला केला तर यांचे अस्तित्व कुठे राहील याचा विचार कधी कोणी केला आहे का ? या मंडळींचे या भाजप पक्षासाठी किती योगदान आहे.काँग्रेसमध्ये ठाण मांडून असताना हीच मंडळी या भाजपला ,’ जातीयवादी ‘ म्हणून हिणवत होती.आज हिच मंडळी आज त्यांच्या मांडीवर अलगत जाऊन बसली आहे.या पातळीवर ही मंडळी पास होणे तर दूरच पण जोड्याजवळ उभ्या करण्याच्या लायकीचे नाही एका निष्ठावान कार्यकर्त्याने म्हटलं ते वावगे ठेवता येणार नाही.भाजपचे नीतीवान राजकारण इतके झटपट घसरेल असे कोणालाही वाटले नव्हते.आज खरे तर पक्षाने देशावर आणि राज्यावर मांड ठोकेलेली असताना त्यांनी जर निष्ठावानाना न्याय दिला नाही तर यांचे इतके कपाळ करंटे हेच ठरतील.परिणामी या पक्षाची महती सांगणारी तोंडे कायमची बंद होतील असे म्हटले तर वावगे होणार नाही.ज्या नेत्यांना भाजपला संख्याबळ आणि सत्तासोपान गाठण्याची पक्षाची तात्कालिक गरज होती असे तात्कालिक काही लोक घेतले तरी या भाजप निष्ठावानाची किती काळजी घेतली याचे एकतरी उदाहरण डोळ्यासमोर आहे का ?आज त्यांना त्यांची नातीगोती सोडून एक तर भाजप निष्ठावान नेमणुकीसाठी दिसतो का? त्यांचेकडून अपेक्षा करणेच व्यर्थ आहे.पण पक्षाला जेथे काळजी नाही त्यांचेकडून काय अपेक्षा करणार ? ते तर या भाजपरुपी पक्षाला आज केवळ फळे आहेत म्हणून झाडावर बसलेले पक्षी आहे.झाडाची फळे ज्या दिवशी संपतील त्याच्या दुसऱ्या दिवशी ही मंडळी पक्षाला वाऱ्यावर सोडून परागंदा होणार आहे याचे भान या मंडळींना कधी येणार ? या खरा प्रश्न आहे.

कलियुगात ज्याच्याकडे धन संपत्ती,असेल त्यालाच लोक कुलीन,सदाचारी आणि सद्गुणी मानतील,धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत शक्ती प्रभावी ठरेल ही भगवान कृष्णाची वाणी आज खरी ठरताना दिसत आहे आणि समाज केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे आणि हेच आजचे वास्तव आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीत ईशान्य गडावरून झालेली बंडाळी फार जुनी नाही.आणि तिला फार दिवस झालेले नाही.अशाच गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक कोणाच्या संगतीने केली त्याचा लेखाजोखा काढला तरी या मंडळींचे भविष्यवाणी करणे अवघड नाही.मंत्री राधाकृष्ण विखे यांचेही वेगळे गणित नाही.मागील महाआघाडीचे सरकार पाडण्याचे कामात त्यांचे योगदान (?) सर्वांना विदित आहे.त्यांना त्याचे फळ या सरकारने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे शपथविधीनंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महसूलमंत्री पदावर शपथ विधी केला याला फार काळ झाला नाही केवळ चार वर्षे झाली आहे.आज मंत्री विखे आणि माजी आ.कोल्हे कुटुंबांचे विल्याभोपळ्याचे वैर आहे हे जिल्ह्यासह राज्याला विदित आहे.त्यामुळे त्यांना हा अडथळा ओलांडून पुढे जावे लागणार आहे.त्यासाठी त्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सहारा घेतला असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पर्यंत पोहचत आहे हे खरे आहे.वर्तमानात मंत्री विखे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात फार सख्य राहिलेले नाही.त्यासाठी मंत्री विखे यांनी पुढची दिल्ली पायरी गाठलेली असल्याचं मानले जात आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि गृहमंत्री अमित शहा यांचेशी त्यांनी सूत साधलेले आहे.त्यामुळे या लढाईत आता कोण बाजी मारणार हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.मात्र राजकारणात ज्याची चादर पायाखाली असते त्यांना राजकारणात केवळ वापरच वाट्याला येतो हे विसरता येणार नाही.कारण साखर कारखानदारीत बऱ्याच गैरव्यवहाराच्या खुंट्या सत्ताधाऱ्यांच्या हातात असताना ते इतक्या सहज पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी नेत्यांना हातात येतील;ही शक्यता दुर्मिळात दुर्मिळ मानली जात आहे.बघू काय होते ते.तालुक्याला एक आमदार वाढला तर किमान पाच कोटीचा निधी तरी नक्कीच वाढणार आहे.हे ही नसे थोडके.कलियुगात ज्याच्याकडे धन संपत्ती,असेल त्यालाच लोक कुलीन,सदाचारी आणि सद्गुणी मानतील,धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत शक्ती प्रभावी ठरेल ही भगवान कृष्णाची वाणी आज खरी ठरताना दिसत आहे आणि समाज केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे आणि हेच आजचे वास्तव आहे हेच खरे.
दरम्यान आगामी निवडणुकीत भाजप संघटनेत निष्ठेने काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे भाजपने घेतला होता.त्यात रवी अनासपुरे,केशव उपाध्ये,राजेश पांडे,दयाशंकर तिवारी,राम सातपुते,संजय केणेकर,दादाराव केचे,संजय भेंडे आदींना भाजप न्याय देणार की,रणजितसिंह निंबाळकर,संजय काका पाटील,विवेक कोल्हे,जगदीश मुळीक,प्रमोद जठार आदीं आगंतुक पाहुण्यांना न्याय देणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.



