जाहिरात-9423439946
निधन वार्ता

कमलाबाई रहाणे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकरराव रहाणे यांच्या धर्मपत्नी कमलाबाई शंकर रहाणे (वय-७९) यांचे काल रात्री ११.४२ वाजता देवाज्ञा झाली आहे.त्यांच्या पश्चात ३ मुले,१ मुलगी नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर बहादरपूर येथील रहाणे वस्तीवर सकाळी ११वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

   

स्व.कमलाबाई रहाणे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून बाहदरपूर आणि परिसरात प्रसिद्ध होत्या.सदर कुटुंब प.पू.शांतिगिरीजी महाराज यांच्या जय बाबा परिवाराशी जोडले गेले होते.गत दोन वर्षांपूर्वी माजी सरपंच शंकरराव रहाणे व त्यांचे सुपुत्र संजय रहाणे यांचे कोरोना काळात निधन झाले होते.त्यानंतर या कुटुंबास मोठा धक्का मानला जात आहे.

स्व.कमलाबाई रहाणे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून बाहदरपूर आणि परिसरात प्रसिद्ध होत्या.सदर कुटुंब शांतिगिरीजी महाराज यांचे जय बाबा परिवाराशी जोडले गेले होते.गत दोन वर्षांपूर्वी माजी सरपंच शंकरराव रहाणे व त्यांचे सुपुत्र संजय रहाणे यांचे कोरोना काळात निधन झाले होते.त्यानंतर ग.भा.कमलाबाई रहाणे यांच्या निधनाने रहाणे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

   सदर अंत्यविधी प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब रहाणे,सरपंच गोपीनाथ रहाणे,उपसरपंच रामनाथ पाडेकर,सोपान रहाणे,कैलास रहाणे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close