जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मारहाण करून,ऍट्रॉसीटीची धमकी,कोपरगावात तिघांविरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील रिद्धी सिद्धी नगर येथील फिर्यादी शैलेश केशवराव साबळे यांचे घराचा आरोपी सोबत सौदा करून तो व्यवहार पूर्ण करत नसताना फिर्यादी हे आपले घर नुकतेच साफ करण्यासाठी गेले असता आरोपी प्रकाश मनोहर खरे,त्यांची पत्नी व खरे यांची मुलगी (पूर्ण नाव माहिती नाही) आदींनी काल दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी सॊबत वाद करून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या डाव्या हाताचे मधल्या बोटास चावा घेऊन फिर्यादीस ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन खिशातील भ्रमणध्वनी लंपास केला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी शैलेश साबळे हे आपल्या घराची साफसफाई करण्यासाठी दि.११ मे रोजी दुपारी ४.३० वाजता आपल्या नातेवाईकांसोबत गेले असता आरोपी प्रकाश खरे व त्याची पत्नी गायत्री खरे व त्यांची मुलगी पूर्ण नाव माहिती नाही आदींनी त्यांना शिवीगाळ करून त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटास चावा घेतला आहे.व त्यांना जखमी केले आहे.साबळे हे राष्ट्रवादीच्या शहर शाखेचे पदाधिकारी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी शैलेश साबळे यांचा आरोपी प्रकाश मनोहर खरे यांच्यात सन-२०२० मध्ये घर खरेदीचा व्यवहार झाला होता.परंतु आरोपी हा व्यवहार पैसे देऊन पूर्ण करत नव्हते.त्यामुळे फिर्यादी शैलेश साबळे हे आपल्या घराची साफसफाई करण्यासाठी दि.११ मे रोजी दुपारी ४.३० वाजता आपल्या नातेवाईकांसोबत गेले असता आरोपी प्रकाश खरे व त्याची पत्नी गायत्री खरे व त्यांची मुलगी पूर्ण नाव माहिती नाही आदींनी त्यांना शिवीगाळ करून त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटास चावा घेतला आहे.व त्यांना जखमी केले आहे.व त्यांच्या खिशातून खाली पडलेला भ्रमणध्वनी हा लंपास केला असल्याचा आरोप केला आहे.व या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान यातील प्रमुख आरोपी हा जिल्हा परिषदेच्या शिर्डी येथील शाळेत प्रभारी मुख्याध्यापक असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्यांच्या विरुद्ध जिल्हा परिषदेच्या नगर येथील एका वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्याने शाळेवर धाड टाकून त्यांच्या जागी अन्य नियमबाह्य शिक्षिका शिकवत असल्याचे उघड केले होते.मात्र यात शिर्डीतील एका नगरसेवकाने राजकीय दबाव वापरून त्यांची सुटका केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट दिली आहे.व या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२२४/२०२३ भा.द.वि.कलम ३२४,३२३,४०३,५०४,५०६,अन्वये तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close