जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

भर बसस्थानकात महिलेस मारहाण,सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा प्रताप ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरातील राज्य परिवहन आगारातील बस स्थानकात आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गाळा विक्रीच्या सात लाख रुपयांच्या कारणावरून बैल बाजार रोड नजीक रहिवासी असलेल्या थोरात नामक महिलेस शिवसेनेचा शहरातील एक माजी उपशहर प्रमुख व राष्ट्रवादीचा एक उपाध्यक्ष यासह काही उडाण टप्पूनीं मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.त्यात सदर महिला फिर्याद देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात गेली असता सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यात मध्यस्थी करून वाद मिटवला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मारहाणीनंतर सदर महिलेस “तू ,”गुन्हा दाखल केला तर तुझी उर्वरित रक्कम मिळणार नाही व गाळाही जाईल” असा गोडी-गुलाबीत समज (दम) दिला आहे.त्यामुळे हताश महिला मोठ्या मिनतवारीने सदर पैसा तर निघून येत आहे असा गोड समज करून तिची विना पैशाची घरी पाठवणी केली आहे.त्यामुळे राज्यात असलेली राष्ट्रवादी आणि सेनेची अनोखी युती कोपरगावातही ऐन हिंदू नववर्ष आणि गुडी पाडव्याच्या दिवशी पाहायला मिळाली असल्याने शहरातील अनेकांनी हा दुर्दैवी घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”सदर महिलेचा पतीचे निधन झालेले असून तीस दोन मुले आहे.त्यातील एक पुण्यात नोकरीनिमित्त पुण्यास गेलेला असताना घरात दुसरा मतिमंद मुलगा आहे.त्यामुळे तिच्या घरात कोणी कर्ता पुरुष नसल्याने ती हताश आहे.याचा गैरफायदा घेत एका टोळक्याने हा प्रताप केला आहे.सदर महिलेचा एक बस स्थानकासमोर,’काले टॉवर’ मध्ये खालच्या मजल्यात एक गाळा असून तो सदर महिलेने सेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्यांस ०७ लाखांचा सौदा करून एक वर्षा पूर्वी विकला होता.त्यातील ०१ लाख रुपयांची रक्कम आगाऊ दिली होती.व उर्वरित रक्कम हि एक वर्षात देण्याचे ठरले होते.त्यात पुरुष सौंदर्य प्रसाधन गृह सुरु करण्याचे काम सुरु होते.मात्र उर्वरीत रकमेचा कालावधी संपल्याने सदर महिलेने त्या रकमेसाठी तगादा सुरु केला होता.मात्र सदर सेनेच्या माजी पदाधिकाऱ्याने त्यास टाळाटाळ सुरु केली होती.वर सहा माहिने उलटूनही तो तिला दाद देत नव्हता.त्यामुळे सदर मूळ मालक असलेल्या थोरात नामक महिलेने त्यांचेकडे वारंवार पैशाचा तगादा सुरु केला होता.मात्र त्यांनी त्यास दाद दिली नव्हती म्हणून सदर महिलेने काही दिवसापूर्वी त्यास कुलूप ठोकले होते.त्यातून हा वाद उदभवला होता.

आज सदर महिला हि बस स्थानकात असताना संशयित आरोपी व सेनेचा एक पदाधिकारी आदींनी राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष असलेल्या व कर्मवीरनगर परिसरात रहिवासी असलेल्या एका कार्यकर्त्यांचा वापर करून तिच्यावर थेट हल्ला चढवला होता.त्यात तिला गंभीर मारहाण केली असल्याचे वृत्त आहे.स्वतः मात्र सेनेचा माजी पदाधिकारी हा नामानिराळा राहिला असल्याचे समजते.सदर महिलेच्या नावात व संशयित आरोपीच्या आडनावात नावसाधर्म्य असल्याची माहिती आहे.

या घटनेने संतप्त झालेली महिला हि कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संतप्त होऊन रडत-गागत व आरडाओरडा करत गेली होती.मात्र आता आपल्यावर सदर घटना शेकणार याचा अंदाज आल्याने सदर महोदयांनी तातडीने आपल्या वरिष्ठ सेना पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यावर उतारा शोधण्यास सुरुवात केली होती.त्यात दोन माजी शहराध्यक्ष असल्याची माहिती आहे.सदर महिलेस “तू ,”गुन्हा दाखल केला तर तुझी उर्वरित रक्कम मिळणार नाही व गाळाही जाईल” असा गोडी-गुलाबीत समज (दम) दिला आहे.त्यामुळे हताश महिला मोठ्या मिनतवारीने सदर पैसा तर निघून येत आहे असा गोड समज करून तिची विना पैशाची घरी पाठवणी केली आहे.त्यामुळे राज्यात असलेली राष्ट्रवादी आणि सेनेची अनोखी युती कोपरगावातही ऐन हिंदू नववर्ष आणि गुडी पाडव्याच्या दिवशी पाहायला मिळाली असल्याने शहरातील अनेकांनी हा दुर्दैवी घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे.व हीच का शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना ? व शरद पवारांची राष्ट्रवादी ? असा सवाल केला आहे.याबाबत शहर पोलिसांनी बस स्थानकातील चलचित्रण तपासले तर सदर गंभीर घटना उघड होणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान याबत पोलिसांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर महिला पोलीस ठाण्यात आली होती मात्र तिला काही लोकांनी बाहेरच घेरले होते.त्या नंतर तिला समजावल्यावर ती निघून गेली असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close