निधन वार्ता
जेष्ठ पत्रकार गंगवाल यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव येथील जुन्या पिढीतील जेष्ठ पत्रकार व गावकरी आणि लोकमत वृत्तपत्रात सुमारे पन्नास वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत आपले भविष्य घडविणारे चंद्रकुमार भाऊलालजी उर्फ सि.बी.गंगवाल (वय-७९) यांचे आज दुपारी ०१ वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,दोन बहिणी,पत्नी,दोन मुले,तीन मुली असा परिवार आहे.
जेष्ठ पत्रकार सि.बी.गंगवाल यांची कारकीर्द हि माजीमंत्री शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे,माजी प्रदेश अध्यक्ष सूर्यभान वहाडणे,विधानसभेचे माजी अध्यक्ष ना.स.फरांदे सर यांच्या काळात बहरली होती.त्यांनी आपल्या पत्रकारीतेची सुरुवात गावकरी पासून केली होती व लोकमत वृत्तपत्रसमूहात अनेक वर्ष आपली सेवा बजावली होती.त्यात त्यांनी कोपरगाव तालुक्याचा पाणी प्रश्न,रस्ते,औद्योगिक प्रश्न,वीज,शेती,सहकार आदी क्षेत्र हाताळत या क्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली होती.
स्व.सि.बी.गंगवाल यांचा जन्म ११ जानेवारी १९४४ चा होता.ते मितभाषी पण तेवढेच कठोर म्हणून पत्रकारितेत दीर्घ काळ रमले होते.त्यांनी समाजातील व राजकीय,धार्मिक क्षेत्रातील अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला होता.तर त्यांची कारकीर्द हि माजीमंत्री शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे,माजी प्रदेश अध्यक्ष सूर्यभान वहाडणे,विधानसभेचे माजी अध्यक्ष ना.स.फरांदे सर यांच्या काळात बहरली होती.त्यांनी आपल्या पत्रकारीतेची सुरुवात गावकरी पासून केली होती.त्यात त्यांनी कोपरगाव तालुक्याचा पाणी प्रश्न,रस्ते,औद्योगिक प्रश्न,वीज,शेती,सहकार आदी क्षेत्र हाताळत या क्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली होती.त्यावेळी गावकरी हे वर्तमान पत्र हे मनमाड वरून रेल्वेने कोपरगावात येत असे.तर बस मार्फत बातम्या पाठविण्याच्या त्या खडतर कालखंडात त्यांनी पत्रकारितेचे व्रत जोपासले होते.पुढे त्यांनी १५ ऑगष्ट १९६२ पासून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली होती.त्या नंतर केसरी,तरुण भारत,सकाळ,नवा मराठा,नवा काळ,हिंदुस्थान समाचार,देशदूत,अजिंठा,नगर टाइम्स,मराठवाडा,विशाल सह्याद्री यादीत जवळपास ५१ वर्ष काम केले होते.त्यांना संपादक दादासाहेब पोतनीस,नानासाहेब परुळेकर,जयंतराव टिळक,द्वा.भा.कर्णिक,अनंतराव पाटील,राजेंद्र दर्डा,बाळासाहेब काणे,जनुभाऊ काणे,दा.प.आपटे,चंदनमल गुंदेचा आदींचा सहवास लाभला होता.
शिर्डी येथील तिर्थक्षेत्रामुळे देशातील राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री,देशात गाजलेले सिनेअभिनेते,अभिनेत्री,निर्माते,दिग्दर्शक आदींचे दौरे त्यांनी संकलन केले होते.कोपरगाव नगर परिषदेत त्यांनी नगसेवक म्हणून सन-१९७४-८१ या कालखंडात काम केले होते.पत्रकार संघटनांचे विविध पदे,जैन समाजासह विविध सरकारी,समाजीक,धार्मिक संस्थात सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवला होता.कोपरगावात १९८४ दंगल त्यांनी अनुभवली होती.व त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात उमटले होते.कोपरगावात त्यावेळी एकही महाविद्यालय नव्हते त्यासाठी व राहुरी विद्यापीठ आदींसाठी त्यांनी आपल्या लिखाणातून वारंवार आवाज उठवला होता.संजीवनी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे ते संस्थापक होते.त्यांच्या काळातच जेष्ठ पत्रकार स.म.कुलकर्णी,शंकरराव कपिले,भास्कर जोशी,छोटुभाई जोबनपुत्रा,टि.बी.मंडलिक आदीं सहकाऱ्यांनी पत्रकारिता फुलवली-फळवली होती.
त्यांच्यावर उद्या सकाळी ९.३० वाजता अंत्यविधी कोपरगाव स्मशान भूमीत विधिवत होणार आहे.ते कोपरगाव येथील वृत्तपत्र छायाचित्रकार कैलास गंगवाल यांचे बंधू तर फार्मासिस्ट जितेंद्र गंगवाल याचे पिताश्री होते.
त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आमदार आशुतोष काळे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,पद्मकांत कुदळे,मंगेश पाटील,भारत संचार निगमचे सल्लागार रवींद्र बोरावके,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,जेष्ठ पत्रकार स.म.कुलकर्णी,वसंत कपिले,सुरेश रासकर,पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे,तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी गायकवाड,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,जयचंद काले,आनंद काले,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,राज्य पेस्टीसाईड संघटनेचे माजी अध्यक्ष कैलास ठोळे,नारायण अग्रवाल आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.