जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात विनयभंगाचा गुन्हा,मात्र ग्रामस्थांत उलटसुलट चर्चा ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दक्षिणेस रहिवासी असलेल्या गावात फिर्यादी महिलेच्या घरात घुसून आरोपी बागुल रा.चाळीसगाव याने तिचा उजवा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून फिर्यादीच्या घराबाहेर लावलेली दुचाकी फिर्यादीच्या संमती शिवाय पळवून नेली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत सदर गावात आणि तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे परिसराच्या दक्षिणेस रहिवासी असलेल्या एका कुटुंबाने व त्यांच्या अन्य सहा-सात जणांच्या मजूर टोळीने अशीच उचल पश्चिम गडावरील कारखान्यावरून मजुरांना देणाऱ्या मुकादमाकडून घेतली होती.व त्यातून या मंडळीने एक दुचाकी खरेदी केली होती.मात्र त्या मोबदल्यात कामावर जाणे अभिप्रेत असताना त्या मुकादमास शेंडी लावून सदर उचल जिरविण्यासाठी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यात गत तीन वर्षापासून जास्तीचा पर्जन्य झाल्याने राज्यात सर्वत्र मजुरांची वानवा आहे.मराठवाडा,खान्देश येथून येणारे ऊस तोडणी मजूर यांची वानवा जाणवत असल्यास आश्चर्य नाही.कोपरगाव तालुक्यात वर्तमानात सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला असून त्यासाठी मजुरांची चणचण भासत आहे.त्यामुळे संबंधित ठेकेदार हे स्थानिक मजूर मिळत असतील तर त्यांच्या शोधात असतात.त्यातून अनेक ऊसतोडणी मुकादम हे आपल्याला ऊस तोडणी मजूर मिळण्यासाठी प्रयत्नशील असतात.त्यातून ते मजूर मिळण्याच्या लालसेने कारखान्याकडून उचलून मजुरांना उचल देतात.व आपला हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असतात.मात्र बऱ्याच वेळा संबंधित मजूर हे मुकादम यांचेकडून उचल घेऊन शेंडी लावण्यात कोणतीही कसूर करत नाही.अशीच घटना नुकतीच उघडकीस आली असून यातून वादविवाद घडल्याचे समोर आले आहे.त्यातून बऱ्याच वेळा भा.द.वि.कलमातील विनयभंगाच्या कलमाचा आधार घेऊन समोरच्याला गारद करण्याचे षडयंत्र रचले जाते अशीच घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे.

कोपरगाव तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे परिसराच्या दक्षिणेस रहिवासी असलेल्या एका कुटुंबाने व त्यांच्या अन्य सहा-सात जणांच्या मजूर टोळीने अशीच उचल पश्चिम गडावरील कारखान्यावरून मजुरांना देणाऱ्या मुकादमाकडून घेतली होती.व त्यातून या मंडळीने एक दुचाकी खरेदी केली होती.मात्र त्या मोबदल्यात कामावर जाणे अभिप्रेत असताना त्या मुकादमास शेंडी लावून सदर उचल जिरविण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे एका महितीत उघड झाले आहे.

संबंधित मुकादम हा ऊस तोडणीसाठी कामास बोलविण्यास आला असता.त्या मजुरी करणाऱ्या कुटुंबाने त्यास अंगठा दाखवला आहे.व त्याने सदर उचल म्हणून दिलेली रक्कम परत मागितली असता त्यातून वादविवाद निर्माण झाला होता.त्यावर गावातील एका प्रतिष्टीत इसमाने मध्यस्थी करून सदर गाडी काढून दिली होती.त्यामुळे हे प्रकरण मिटणार अशी शक्यता निर्माण होणे गरजेचे असताना मात्र संबधीत मध्यस्थ निघून गेले असल्याचे पाहून संबंधित महिलेने आपला हिसका दाखवला आहे.व तो गेला असता त्या पश्चात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन सदर मुकदमा विरुद्ध आपल्या मुलींच्या हजेरीत घरात घुसून विनयभंगाचा व ६० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला असल्याची गंभीर व धक्कादायक बाब कोपरगाव तालुक्यात उघड झाली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी तातडीने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व सहाय्यक फौजदार कुसारे यांनीही यांनी नुकतीच भेट दिली आहे.दरम्यान या घटनेबाबत आगामी पोलीस तपासात आगामी सत्य उघड होणार असल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी भा.द.वि.कलम ४५७,४५४,३८० प्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील आरोपी मुकदमाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस सहाय्यक फौजदार गवसणे हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close